Nashik

नाशिकची बदनामी थांबवा, सर्वांगसुंदर झाले नाशिक चे साहित्य संमेलन, -:अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद जिल्हाध्यक्ष गायकर यांची स्पष्टोक्ती

नाशिकची बदनामी थांबवा, सर्वांगसुंदर झाले नाशिक चे साहित्य संमेलन,
-:अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद जिल्हाध्यक्ष गायकर यांची स्पष्टोक्ती,

नाशिक शांताराम दुनबळे.
नाशिक= नाशिक शहरात गतवर्षी २०२१ मध्ये पार पडलेले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही अनेक अडचणींना तोंड देत व कमीत कमी वेळातही अभुतपुर्व रित्या प्रचंड यशस्वी झाले आहे. असे असतानाही या संमेलनाचे कर्ते धर्तेच विनाकारण वाद उकरून काढत नाशिकची नाहक बदनामी करत आहेत. हा प्रकार अशोभनीय असा आहे. यातून साहित्यिक व साहित्य जगताचेच हसु होत असुन साहित्य चळवळी जिवंत ठेवण्यासाठी करण्यात येणाऱ्या प्रयत्नांना यामुळे तीव्र फटका बसेल. भविष्यात सामान्य लोकाचां साहित्य क्षेत्रातील लोकाकडे व साहित्यिक मंडळीकडेही पाहण्याचा द्रुष्टिकोनही दुषित होईल असे नमूद करत नाशिक साहित्य संमेलनाचा वाद निरर्थक असुन विनाकारण बदनामी थांबवा असे आवाहन अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद नाशिक जिल्हाध्यक्ष, तथा प्रेस संपादक पञकार सेवा संघ जिल्हाध्यक्ष नवनाथ अर्जुन पा. गायकर यांनी केले आहे.
गेल्या काही दिवसापासून सोशल मिडिया वर व प्रसारमाध्यमाद्वारे विनाकारण वाद उभा करत नाशिक ची बदनामी सुरू असुन यामुळे आपण व आपली परिषद पदाधिकारी, सभासद व अनेक साहित्यिक व साहित्य प्रेमी व्यथित झाल्याची खंतही गायकर यांनी व्यक्त केली आहे.

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन खरेतर महाराष्ट्राबाहेर भरवण्याची प्रारंभी चर्चा सुरू होती.मात्र अकस्मात संपूर्ण जग ठप्प करणारी कोरोना नामक भीषण महामारी फैलावली आणि अशा प्रतिकूल परिस्थितीत नाशिककरच हे संमेलन यशस्वी करतील असा ठाम विश्वास ठेवत महामंडळाच्या पदाधिकारी यांनी नाशिक वर विश्वास दाखवला. ही तमाम नाशिककरांसाठी अभिमानास्पद बाब होती व नाशिककरानींही हा विश्वास सार्थ ठरवत हे संमेलन प्रतिकूल परिस्थितीतही अत्यंत यशस्वी करुन दाखवले यात कुणाच्या ही मनात शंका असण्याचे कारण नाही. या यशस्वी आयोजनाचे निखळ श्रेय नाशिककरानां मिळायलाच हवे.
माझ्या सारख्या नाशिक शहर व जिल्हाभरातील असंख्य साहित्यिक मंडळीनी जमेल तसा खारीचा वाटा उचलत हा गोवर्धन पर्वत यशस्वी पणे पेलला.

फेब्रुवारी- मार्च दरम्यान प्रथम हे नियोजित संमेलन ठरले होते. ते यशस्वी करण्यासाठी जवळपास सर्वच तयारी झालेली असतानाच अकस्मात कोरोनाच्या थैमानामुळे हे साहित्य संमेलन स्थगित करण्यात आले.
त्यानंतर अगदी कमी वेळ असतानाच नोव्हेंबर मध्ये या संमेलनाची घोषणा करण्यात आली आणि अगदी अल्प कालावधीत च नाशिक मधील साहित्यिक, राजकीय, प्रशासकीय आदीसह समाजातील सर्वच घटकांनी पडदयाआड रहात या संमेलन यशस्वीपणे पार पाडण्यासाठी कष्ट घेतले आहे, हे निर्विवाद सत्य आहे.
काहिनीं या संमेलनात राजकीय सहभागावर टिका करत गालबोट लावण्याचा प्रयत्न केला. पण या वादाकडे पाहण्याचा द्रुष्टिकोन च मुळात चुकिचा आहे.राजकीय नेते सामाजिक क्षेत्रात सर्वच ठिकाणी वावरत असतात ते साहित्यिक क्षेत्रात ही सहभागी झाल्याने नेमके बिघडते कुठे ? हा अनाकलनीय प्रश्न आहे.
त्यांच्या सहकार्याने अन्य धावपळ कमी होऊन सोहळा अधिक सुखकर होत असेल तर आनंदच आहे कि. या गोष्टीचे खरेतर स्वागतच व्हायला हवे.
या उलट त्यांच्या नावाने बोटे का मोडली जातात हेच कळत नाही. एरवी सर्वच कामासाठी हयाच मंडळीचा आधार सार्यांना चालतो.अगदी जे टिकाकार आहेत त्यांनाही. मग साहित्य मेळयातच ही मंडळी अस्पृश्य का ठरवावी ? जर काहिचें म्हणणे असेल कि ही मंडळी साहित्यिक मंचावर घुसखोरी करत संमेलनाचे स्वरूप बदलवून टाकत असतात तर मग स्वाभिमानाने या मंडळीनां कायमचे दुरच ठेवा ना. नाशिक पुर्वीही अन्यत्र झालेल्या साहित्य संमेलनात राजकीय नेते आले किंवा बोलावले गेले नाही असे एकही उदाहरण नाही. मग नाशिकच्याच नावाने विनाकारण शिमगा का ?

काहिनीं प्रतिसादाबद्दल ही प्रश्न केले. मुळात आधीच कोरोनाचे सावट, आणि त्यातच अकस्मात संपूर्ण देशभर ढगाळ व पावसाळी वातावरण निर्माण झाले होते याचा विसर प्रश्नकर्त्यानां पडलेला दिसतो. याचा तीव्र परिणाम गर्दीवर झाला असला तरी स्थानिकांनी याही भीतीदायक कोरोनाच्या सावटाखाली ही अपेक्षेपेक्षा ही नक्कीच चांगला प्रतिसाद या संमेलनास दिला आहे. त्यामुळे प्रतिकूल परिस्थितीतही हे संमेलन यशस्वी च झाले आहे असा दावा गायकर यांनी केला आहे.
या साहित्य संमेलनातून निष्पन्न काय झाले ? असा सवाल काहिनीं केला आहे. मुळातच हा सवालच हास्यास्पद आहे. कारण हा सवाल नेहमीच येतो पावसाळा या उक्तीप्रमाणे दर संमेलनाच्या संपन्नेनंतर हमखास विचारलाच जातो. आणि तरीही आश्चर्य म्हणजे परत पुढच्या साहित्य संमेलनाच्या तयारीसाठी पुन्हा एकदा अभुतपुर्व उत्साहाने काम हाती घेतले जाते. यातच या प्रश्नाचे फोलपणा आहे.
या साहित्य संमेलनाच्या निमित्ताने सामान्य साहित्यिक व साहित्य प्रेमींना झालेला आनंद, पंढरपूर च्या दरवर्षी च्या वारीप्रमाणेचा उत्साह जसा अवर्णनीय आहे, अगदीच तसाच अनुभव व अनुभूती साहित्यिक व साहित्य प्रेमी लुटत असतात.
या संमेलन संपन्नेनंतर बर्याच उशीराने या संमेलनाच्या कर्त्या धर्त्यानींच यावर टिकास्र सोडावे हे अनाकलनीय आहे.हे म्हंणजे आपल्याच कार्यात आपणच नियोजन करायचे, संमतीही दयायची , सहभागी ही व्हायचे आणि मग आपलेच वाभाडे आपणच काढायचे हा प्रकारच मुळात हास्यास्पद आहे.
उलट या पदावर वर्षानुवर्षे ठाण मांडून स्वतः चेच कौतुक करुन घेण्यापेक्षा लोकशाही पद्धतीने खर्या साहित्यिक मंडळींना या ठिकाणी संधी दिली जावी. व त्यातून साचलेपण दुर करावे व नव्या कल्पनांनाही वाव दयावा. हा मनाचा मोठेपणा ही मंडळी दाखवतील का ? असा सवाल करत स्वतः पंचतारांकित सुविधा उपभोगायच्या व पुन्हा शिमगाही करायचा हे म्हंणजे “मी नाही त्यातली, अनं कडी लावा आतली” असाच प्रकार असल्याचा चिमटा गायकर यांनी काढला आहे.

आमची अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद संस्थापक अध्यक्ष मा.शरद गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण महाराष्ट्र भर काम करते आहे. विशेष म्हंणजे आमची संस्था व्यापक प्रमाणात साहित्यिक चळवळी राबवत आहे. शासनाची एक रुपयाही मदत न घेता तब्बल पंधरा पंधरा भव्य दिव्य साहित्य संमेलन सलग पंधरा वर्षे महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात ग्रामीण भागात, असुविधा जनक ठिकाणी राबवत आहे.हे अत्यंत अवघड काम असुन ही साहित्यिक संस्था अगदी एकनिष्ठ पणे हे व्रत अखंड चालवत आहे. या अशा संस्थाचा सबंधित आयजीच्या जीवावर बायजी उदार प्रव्रुत्तीच्या लोकांनी कमीत कमी शोध व बोध घ्यावा असा टोलाही गायकर यांनी लगावला आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button