Aurangabad

अमृतसरहुन कुरियरने मागवल्या तलवारी, आरोपीस अटक करून जप्त केल्या 49 तलवारी

अमृतसरहुन कुरियरने मागवल्या तलवारी, आरोपीस अटक करून जप्त केल्या 49 तलवारी

गणेश ढेंबरे औरंगाबाद

औरंगाबाद : इंदिरानगर बायजीपुरा येथील दानिश खान याच्या नावावर अमृतसरवरून कुरियरमध्ये आलेल्या 5 तलवारीसह दानिशला रात्री उशिरा ताब्यात घेऊन त्याच्याकडून जिन्सी पोलिसांनी तब्बल 49 तलवारी जप्त केल्या आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बायजीपुरा येथील इंदिरानगरच्या दानिश खानच्या नावावर हिना किराणा स्टाेअर्स या पत्त्यावर ‘ब्लू डार्ट’ कुरियरने अमृतसर येथील अरमान इंटरप्राईजेसकडून लाकडी खेळण्याच्या नावाखाली तलवारी येत असल्याची माहिती पुंडलिकनगर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक घनश्याम साेनवणे यांना मिळाली.

या माहितीवरून शनिवारी दुपारी दोनच्या सुमारास सेव्हन हिल उड्डाण पुलाखाली स्वत: धनश्याम सोनवणे आणि त्यांच्या पथकाने सापळा रचला होता. दुपारी दोनच्या सुमारास ब्लू डार्ट कुरियरचा छोटा हत्ती (क्र. MH 20 EG-1107) यास ताब्यात घेऊन झडती घेतली असता त्यात दानिश खान नावाचे पार्सल मिळून आले.

हे पार्सल अमृतसर येथून मागवण्यात आले होते. त्या पार्सलवर लाकडी खेळणी असा उल्लेख होता. पार्सल फोडून पाहिले असता त्यात 5 तलवारी आढळून आल्या. दुपारपासूनच पुंडलिकनगर पोलिसांनी दानिशचा शोध घेऊन रात्री ताब्यात घेतले.

दरम्यान हे पार्सल जिन्सी पोलिस ठाण्याच्या हद्दीत जात हा गुन्हा जिन्सी पोलिसांकडे वर्ग केला. त्यानंतर जिन्सी पाेलिसांनी रात्री उशिरापर्यंत दानिशच्या ताब्यातून 49 तलवारी जप्त केल्या, अशी माहिती उपायुक्त गिऱ्हे यांनी दिली.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button