AmalnerMaharashtra

महिलांवरील अन्याय थांबवा अ भा वि प चे निवेदन आणि आंदोलन

महिलांवरील अन्याय थांबवा अ भा वि प चे निवेदन आणि आंदोलन

अमळनेर : यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवताः ।
म्हणजे जिथे नारी ची पूजा होते तिथेच देवाचा सहवास असतो, हे आपल्या भारतीय संस्कृती मधील मान्यता आहे. पण अलीकडच्या काळात आपल्याला असे होताना दिसत नाही आहे.
गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्रात महिलावरील अत्याचार वाढत आहेत.त्यां अनुषंगाने अखिल भारतीय विद्यार्थी परिषदे तर्फे आज अमळनेर येथे तहसील कार्यालया समोर आंदोलन केले व पोलीस निरीक्षकांना निवेदन देण्यात आले ,यात दोषीवर लवकरात लवकर कारवाही करावी व पुढे या प्रकारच्या घटना हू नये या साठी कायदा करावा अशीच मागणी या निवेदनात अखिल भारतीय विध्यार्थी परिषदे ने केली आहे,या वेळी केशव पाटील, अभय काळे, रोहित पाटील, गणेश मिस्त्री,प्रितेश पाटील,पवन सातपुते,भूषण पाटील, कुणाल पाटील,देवयानी भावसार व प्रगती काळे गौरव नांद्रे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button