Chandwad

दगडी शाळेला गतवैभव प्राप्त करण्याचा प्रयत्न करणार-मुख्याध्यापक महाले सर व शिक्षक वृंद…

दगडी शाळेला गतवैभव प्राप्त करण्याचा प्रयत्न करणार-मुख्याध्यापक महाले सर व शिक्षक वृंद…

उदय वायकोळे चांदवड

चांदवड : चांदवड शहरातील जिल्हा परिषद संचलित दगडी शाळा म्हणजे आजपर्यंत अनेक अधिकारी,राजकारणी, आमदार व मोठे व्यावसायिक याच शाळेत लहानपण गेलेले आहेत. अनेकांनी पहिली ते चौथी पर्यंत या शाळेत शिक्षण घेऊन त्यानंतर इतरत्र जाऊन नाव कमविलेले आहे.
यातच सकारात्मक बाब म्हणजे
आपणा सर्वांना माहितच आहे की गेल्या तीन ते चार वर्षापासून शाळेतील शिक्षक, माजी विद्यार्थी आणि शिक्षणप्रेमी बंधू भगिनी हे शाळेच्या विकासासाठी सतत प्रयत्नशील आहेत. शाळेत होत असलेला बदल आणि आपणा सर्वांची धडपड बघून शाळेचे माजी विद्यार्थी श्री रुपेश भाऊ पवार व श्री रुपेश भाऊ गायकवाड यांनी आपली स्वतःची मुले इंग्लिश मिडीयम मधून काढून आपल्या शाळेत दाखल केली. ही शाळेसाठी गौरवाची बाब आहे. इंग्लिश मीडियम ची मुले दगडी शाळेत दाखल होण्याची ही पहिलीच घटना आहे असे मुख्याध्यापक महाले सर यांनी ठोस प्रहार प्रतिनिधींशी बोलताना सांगितले. दोन्ही पालकांनी शाळेवर आणि शाळेतील शिक्षकांवर जो विश्वास दाखवला त्याबद्दल दोघा पालकांचे मुख्याध्यापक व शिक्षकवृंद यांच्यातर्फे अभिनंदन करण्यात आले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button