Pune

? महत्वाचे..देहविक्रय करणाऱ्या  महिलांना अनौपचारिक कामगारांचा  दर्जा ..राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने जाहीर केली मार्गदर्शक तत्वे..काय आहेत मार्गदर्शक तत्वे..

देहविक्रय करणाऱ्या महिलांना अनौपचारिक कामगारांचा दर्जा ..राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने जाहीर केली मार्गदर्शक तत्वे..प्रा जयश्री दाभाडेपुणेःउदरनिर्वाह करण्यासाठी मजबुरीने अनेक महिला देह विक्री करतात.अनेक वेळा या महिलांना चुकीच्या दृष्टीने पाहिले जाते.आता मानवाधिकार आयोगाने या संदर्भात मार्गदर्शक तत्वे जाहीर केले आहेत. या अनुषंगाने देहविक्रय करणाऱ्या महिलांना अनौपचारिक कामगाराचा दर्जा मिळाला आहे. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने देह विक्री करणाऱ्या महिलांना कामगारांसाठीच्या योजनांसह अन्य सोयी-सुविधांचा लाभ मिळावा, अशी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली असून त्यांचे पालन करण्याचे राज्य सरकारला सूचित केले आहे.करोना प्रादुर्भावाच्या काळात हाताला काम नसल्याने असंख्य सर्वाधिक
कामगारांचे हाल झाले, त्यामध्ये करणाऱ्या देहविक्री करणाऱ्या महिलांना देखील मोठा 0फटका बसला आहे. देह विक्री करणे हे काम देखील सन्मानास पात्र असून त्यात कोणताही गुन्हा नाही. पोटाची खळगी भरण्यासाठी महिला हे काम करतात त्यामुळे त्यांना सन्माम मिळावा या उद्देशाने अनौपचारिक कामगार म्हणून दर्जा मिळावा ,अशी मागणी करणारे पत्र देहविक्रय करणाऱ्या महिलांची नॅशनल नेटवर्क ऑफ सेक्स वर्कर्स यांनी केली होती.याची दखल घेत राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत.पोट भरण्याच्या आणि मानवी जीव म्हणून जगण्याचा अधिकार असलेल्या ह्या महिलांनी ही लढाई असून स्वतःला माणूस किंवा मानवी जीव म्हणून सिद्ध करण्याची, समाजात मान सन्मान मिळण्याची देखील लढाई आहे.वरील संघटनेनेबराष्ट्रीय मानवाधिकार सन्मानाने जगण्याचा अधिकार मिळावा असे पत्र आयोगाला पाठविले होते. त्याची दखल घेत आयोगाने देहविक्रय हा निर्णय घेतला आहे. हा देहविक्रय करणाऱ्या महिलांसाच्या चळवळीचा विजय आहे.
मार्गदर्शक तत्त्वे प्रसिद्ध केली आहेत, असे म्हणता येईल.करोना काळात अनेक कामगारांना मदत मिळाली पण देह विक्री करणाऱ्या महिला वंचीत राहिल्या त्यांनाही राष्ट्रीय कामगारांप्रमाणे मदत मिळायला हवी,
राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने अनौपचारिक कामगारांचा दर्जा बहाल मान्य केले हे खूप महत्वपूर्ण आहे.

  • ही आहेत मार्गदर्शक तत्वे..
  • देह विक्री करणाऱ्या महिलांना विशेषतः बाळंत आणि लहान मूल असलेल्या महिलांना 23 जुलै च्या अध्यादेशा नुसार राज्य सरकार मदत करेल.
  • या महिलांनी अनौपचारिक कामगार म्हणून नोंदणी करावी त्यामुळे त्यांना कामगारांचे सर्व लाभ मिळतील.
  • महिलांना तात्पुरती सरकारी कागदपत्रे ओळख पत्रे रेशनकार्ड इ द्यावीत की जेणेकरून त्यांना योजनांचा लाभ घेता येईल.
  • स्थलांतरित मजुरांना मिळणारे लाभ स्थलांतरित देह विक्री करणाऱ्या महिलांना लागू करावेत.या महिलांना कोरोना चाचणी आणि उपचार मोफत उपलब्ध करून घ्यावेत.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button