Faijpur

फैजपुरात शेतकरीविरोधी कायद्याच्या विरोधात प्रांत अधिकारी यांना निवेदन

फैजपुरात शेतकरीविरोधी कायद्याच्या विरोधात प्रांत अधिकारी यांना निवेदन

सलीम पिंजारी फैजपूर तालुका यावल

फैजपूर : येथील गेल्या तीन महिन्यांपासून शेतकरी केंद्र सरकारविरोधात आंदोलन करीत असून केंद्र सरकार शेतकर्यांची दखल घेत नसल्यामुळे आज फैजपुरात प्रांत अधिकारी कैलास कडलग यांना आज वंचित बहुजन आघाडीतर्फे शेतकर्यांच्या मागणीसाठी आज निवेदन देण्यात आले असून भारतातील शेतकरी आज स्वतहक्काच्या मागणीसाठीआंदोलन करावे लागत आहे हे मोठी खेदाची बाब असून शेतकर्यांना मुळे देशाची अर्थव्यवस्था सुधारली जाते परंतु आज शेतकर्यांवर अन्याय होत असल्यामुळे गेल्या तीन महिन्यांपासून शेतकरी अांदाेलनकायद्याअंतर्गत अांदाेलन सुरु असून सुरु त्याला महाराष्ट्र सरकारसुद्धा मज्जाव करीत असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे जेव्हा भारतात मनमोहन सरकारने कायदा अमलात आणला तेव्हा केवळ देखावा केला होता असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे तोच कायदा भाजपा सरकार अमलात आणून हेसुद्धा देखावा करीत असल्याचे बहुजन वंचित आघाडी ने निवेदनात म्हटले आहे त्या वेळची मनमोहन सरकार आणि नरेंद्र मोदी सरकार हे दोन्ही मिलिभगत असल्यामुळे हे केवळ शेतकर्यांची फसवणूक करीत असल्याचे म्हटले आहे म्हणून शेतकर्यांचे जिवावर केवळ राजकारण केले जात असल्याचे नमूद करण्यात आले आहे या कायद्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात हाल होणार असल्याचे म्हटले आहे कारण या कायद्यात शेतकर्यांच्या हमीभावाची तरतूद नसून कृषी उत्पन्न बाजार समिती बंद करण्याची तरतूद आहे या आंदोलनात उत्तर भारतातील शेतकरी आंदोलन करीत असून हे केवळ देखावा असल्याचे म्हटले आहे कारण एकीकडे दोन हजार सहामध्ये तेच विधेयक मंजूर करून त्याच्याच विरोध करत आहे हा केवळ महाराष्ट्र सरकारने खेळ मांडला असल्याचे नमूद करण्यात आले आहे या सर्व बाबींना वंचित बहुजन आघाडी पाठींबा देत असून वेळप्रसंगी रस्त्यावर सुद्धा उतरेल असेही निवेदनात म्हटले आहे आज फैजपूर विभागाचे प्रांत अधिकारी यांना बहुजन वंचित आघाडीतर्फे निवेदन देण्यात आले असून हे निवेदन बाबा साहेब आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच फैजपूरचे मा नगरसेवक मनोज कापडे यांच्या नेतृत्वाखाली मनोज बाऱ्हे राजेंद्र बारी भगवान मेघे दीपक मेघे राजेश गवळी विजय सावकारे मिलिंद जंजाळे शशिकांत ढोलेयांनी निवेदन दिले आहे

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button