सातव्या वेतन आयोगाच्या प्रलंबित फरक मिळण्यासाठी तिघा कामगार संघटनांनी दिले नपा प्रशासनाला निवेदन
अमळनेर :- नगरपालिका सेवेतील कामगार व कार्यालयीन कर्मचारी यांना सातव्या वेतन आयोगाच्या ५० टक्के फरकाची रक्कम तातडीने देण्यात यावी या मागणीचे निवेदन अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस, नगरपालिका कामगार युनियन व महाराष्ट्र कामगार कर्मचारी संघ या कामगार संघटनांनी नगरपालिका प्रशासनाला दिले.
अमळनेर नगर परिषदेच्या कामगार व कारभार कार्यालयीन कर्मचारी यांना सातव्या वेतन आयोगाच्या फरकाची ५० टक्के रक्कम अजूनही मिळालेली नाहीत.यासह सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना ग्रॅज्युटी, रजारोखी, वैद्यकीय बीले तातडीने अदा केले जात नाही. वास्तविक नगरपालिकेकडून करदात्यांकडून जोरदार थकित कर वसुलीची मोहीम सुरू आहे.कर वसुलीतून नगरपालिकेला काही दिवसातच कोट्यवधी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. मिळालेल्या कर रकमेतून नगरपालिका कर्मचाऱ्यांच्या सातवा वेतन आयोगाच्या प्रलंबित ५० टक्के फरकाची रक्कम तसेच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसह कामगार व कर्मचाऱ्यांच्या ग्रॅज्युईटी, र रजा रोख व वैद्यकीय देता येणे शक्य आहे.याबाबत नगरपालिका प्रशासनाने तातडीने कारवाई करून कर्मचारी हिताचा निर्णय घ्यावा या मागणीचे निवेदन नगरपालिकेच्या प्रशासक तथा उपविभागीय अधिकारी सीमा अहिरे व मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांना रघुनाथ रामभाऊ मोरे, विनोद टील्लू जाधव,रुपचंद शिवा पारे, राजेंद्र ईदंरलाल चंडाले, रा.रा. पवार, बिंदुकुमार भानुदास सोनवणे यांनी दिले. यावेळी मुकेश आत्माराम बिऱ्हाडे, गौतम मोरे, नवल बिऱ्हाडे, विकास मोरे, भाऊलाल बिऱ्हाडे, रमेश सोनवणे, बाळू अप्पा पाटील, करण जाधव, विजय पवार, सुशील बोयत यांच्यासह भारतीय सफाई मजदूर काँग्रेस, नगरपालिका कामगार युनियन व अखिल महाराष्ट्र कामगार कर्मचारी संघाचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.