Amalner

जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत आ रोहित पवार यांना निवेदन..

जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत आ रोहित पवार यांना निवेदन..

अमळनेर येथिल अमळनेर खाजगी प्राथमिक शाळांच्या शिक्षक पदाधिकारी यांच्यावतीने आ.रोहित पवार यांना राज्यातील शिक्षकांना जुनी पेशन योजना लागू करण्याच्या मागणीचे निवेदन देण्यात आले.
अमळनेर येथे भक्ती शक्ती स्मारकाच्या लोकार्पण सोहळ्यासाठी आलेले असतांना आ.रोहित पवार यांना अमळनेर च्या मान्यताप्राप्त खाजगी शाळांच्या शिक्षकांच्यावतीने निवेदन देण्यात आले.राज्यातील खाजगी शाळा शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी सुरू असलेली DCPS,NPS पेंशन योजनेची अंमलबजावणी तात्काळ थांबवून १९८२-८४ ची जुनी पेन्शन योजना पूर्वरत सुरू करावी या मागणीचे सविस्तर निवेदन आ.रोहित पवार यांना महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन हक्क संघटनेचे पत्राद्वारे देण्यात आले. यावेळी शिक्षक कार्यकर्ते जयेश शिरसाठ,बापूराव ठाकरे, राष्ट्रवादी शिक्षक संघटनेचे कैलास पाटील, खाजगी शिक्षक संघाचे आशिष पवार,मुख्याध्यापक रणजित शिंदे, पदाधिकारी अनंत सूर्यवंशी, मिलिंद निकम ,यांचेसह नगरसेवक श्याम पाटील अर्बन बँकेचे व्हा.चेअरमन प्रविण पाटील उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button