Chandwad

चांदवड तालुक्यातील पूर्व भागातील विविध समस्यांबाबत ना भारतीताई पवार यांना निवेदन

चांदवड तालुक्यातील पूर्व भागातील विविध समस्यांबाबत ना भारतीताई पवार यांना निवेदन

उदय वायकोळे चांदवड

चांदवड : चांदवड तालुक्यामधील पूर्व भागामध्ये मागील आठवड्यात मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस झाल्याकारणाने लासलगाव ते मनमाड दरम्यान ची वाकी तळेगाव रोही वडगाव पंगु रापली या गावांमध्ये साधारणतः गेट नंबर 106 ते गट नंबर 112 या परिसरामध्ये मागील काळामध्ये रेल्वे प्रशासनाने अंडरपास निर्माण केले आणि कायमस्वरूपी गेट बंद केले त्यामुळे आज अति पावसामुळे जे अंडरपास केलेले आहे त्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाणी साचलेले आहे. मशिनरीने पाणी काढले जात आहे तरीही पाणी निघत नाही कारण ते अंडरपास जमिनीपासून खोलवर आहेत तसेच गट नंबर 111 वडगाव पंगु या ठिकाणी पूर्वीपासूनच नैसर्गिक पद्धतीचा अंडरपास असल्याने त्या ठिकाणी अंडरपासच्या आजूबाजूला जाण्यासाठी कुठलीही व्यवस्था नसल्याने आज अनेक गावांचा संपर्क त्याठिकाणी तुटलेला आहे चांदवडच्या कुठल्याही व्यक्तीला कुठल्याही व्यक्तीला कातरवाडी, रापली, वडगाव पंगु व तळेगाव रोही या गावांमध्ये जाता येत नाही त्यामुळे तात्काळ एक तर हे बंद असलेले गेट खुले करून द्यावे मागील किंवा कायमस्वरूपी चा अंडरपास व्यतिरिक्त अजूनही वेगळा काही मार्ग करता येईल का व पास याची दखल आज पूर्व भागात अवकाळी पावसाची झालेल्या नुकसानीची पाहणी करत असताना नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या व अंडरपास मधील साचलेल्या पाण्यासंदर्भात ही नागरिकांनी सूचना केल्या व त्याच संधार्भात झालेल्या नुकसानीची ही दखल घ्यावी यासाठीचे निवेदन माननीय नामदार केंद्रीय मंत्री डॉ.भारतीताई पवार यांना तालुक्याचे आमदार डॉ. राहुल दादा आहेर, जि प गटनेते डॉ.आत्माराम कुंभार्डे, भाजपा तालुका अध्यक्ष मनोज शिंदे, योगेश ढोमसे, सचिन राऊत आदी मान्यवरांनी याठिकाणी निवेदन दिले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button