Amalner

सरस्वती विद्या मंदिर शाळेत शालेय पोषण आहाराबाबत जागृती करणारा सप्टेंबर पोषण माह साजरा..

सरस्वती विद्या मंदिर शाळेत शालेय पोषण आहाराबाबत  जागृती करणारा  ‘ सप्टेंबर पोषण माह’ साजरा.. 

सरस्वती विद्या मंदिर शाळेत शालेय पोषण आहाराबाबत जागृती करणारा सप्टेंबर पोषण माह साजरा..

अमळनेर येथिल सरस्वती विद्या मंदिर शाळेत शालेय पोषण आहाराबाबत  जागृती करणारा  ‘ सप्टेंबर पोषण माह’ साजरा करण्यात आला.आरोग्यदायी सवयी या विषयावर अनुभवी तज्ञ आरोग्य सेविकेतर्फे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
              शालेय पोषण आहार योजने अंतर्गत केंद्र सरकारने सप्टेंबर महिना पोषण माह म्हणून जाहिर केलेला आहे.पोषण माह अंतर्गत आहार व आरोग्य या विषयी विविध उपक्रम आयोजित केले जात आहेत. सरस्वती विद्या मंदिर येथे नगरपालिका आरोग्य विभागाच्या आरोग्य सेविका सौ.प्रतिभा पाटील यांनी चांगल्या आरोग्यासाठी चांगल्या सवयी अंगी असाव्यात! असे आवाहन उपस्थित विद्यार्थ्यांना ‘आरोग्यविषयक सवयी’ या विषयावर सविस्तर मार्गदर्शन करतांना  केले. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी अनेक प्रश्न विचारून आपल्या शंका मांडल्या तर आरोग्य सेविका सौ.प्रतिभा पाटील यांनी  विद्यार्थ्यांचे आरोग्यविषयक
प्रश्नांचे समाधान केले यावेळी तंबाखू जन्य पदार्थांचे कॅन्सर सारख्या आजाराच्या रूपाने विपरीत दुष्परिणाम उद्भवतात म्हणून बालकांनी तंबाकू जन्य पदार्थांपासूनही दूर राहावे असे आवाहन यावेळी केले. 

सरस्वती विद्या मंदिर शाळेत शालेय पोषण आहाराबाबत जागृती करणारा सप्टेंबर पोषण माह साजरा..
             मुख्याध्यापक रणजित शिंदे यांनी प्रास्ताविकात आरोग्यदायी सवयी आणि पोषण आहार याबाबत विद्यार्थ्यांना माहिती दिली.याप्रसंगी शिक्षक आंनदा पाटील, ऋषिकेश महाळपूरकर,सौ.संध्या ढबू,परशुराम गांगुर्डे,धर्मा धनगर आदि उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button