Jalgaon

मनपा मालकी चे गोलाणी मार्केट मधील धुळखात पडलेले हॉल भाडे तत्वावर सर्वांसाठी उपलब्ध करण्यासाठी विविध सामाजिक संस्था चें निवेदन.

मनपा मालकी चे गोलाणी मार्केट मधील धुळखात पडलेले हॉल भाडे तत्वावर सर्वांसाठी उपलब्ध करण्यासाठी विविध सामाजिक संस्था चें निवेदन.

जळगाव:
जळगाव शहर मनपा मालकी चे गोलाणी मार्केट मधील धुळखात पडलेले हॉल भाडे तत्वावर उपलब्ध करण्यासाठी आज सेवक सेवाभावी संस्था, हिंदुत्व स्वाभिमान, रिद्धि जान्हवी फाउंडेशन या सामाजिक संस्था व संघटने च्या वतीने मनपा उपायुक्त ‌श्री,प्रशांत पाटील यांना देण्यात आले.
सदर निवेदन मधे मागील अनेक वर्षा पासुन गोलाणी मार्केट मधील धुळखात पडलेले प्रशस्त हॉल ज्याचे विवीध सामाजिक कार्यां साठी योग्य रितीने उपयोग होऊ शकतो व त्याचा माध्यमातुन जळगाव मनपा ला आर्थिक उत्पन्न मिळू शकते हि बाब लक्षात ठेऊन त्या साठी सदर हॉल मधे काही सुधारणा करून जळगाव कर नांगरिकांसाठी उपलब्ध करुन दिल्यास सामाजिक कार्यां साठी याचा लाभ सामान्य माणसांना होऊं शकतो याची दखल घेण्यात यावीं असे सदर निवेदन मधे म्हणण्यात आले आहे.
तसेच गेली अनेक वर्षा पासुन सदर हॉल विना वापर व बंद असल्याने तिथे विघातक पृवृत्ति चे लोक मद्यपान करतात व तेथील रहिवास्यांना त्रासदायक वातावरण निर्माण करून शासकीय मालमत्तेला नुकसान पहुचंवण्याचे प्रयत्न करतात असे ही निवेदनात म्हंटले आहे.
निवेदन देते वेळी सेवक सेवाभावी संस्था, हिंदुत्व स्वाभिमान चे संस्थापक विशाल शर्मा,जिनल जैन, सुशील अग्रवाल, रिद्धि जान्हवी फाउंडेशन च्या अध्यक्षा सौ, चित्रलेखा मालपाणी,चेतन कासार तर हिंदुत्व स्वाभिमान चे महासचिव मयुर बारी, उपाध्यक्ष विवेक महाजन, गणेश पाटील, रोहित शर्मा, अमित अग्रवाल यांची उपस्थिति होती.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button