Nandurbar

अघोषित लोडशेडिंग बंद होणे कामी जिल्हाधिकाऱ्यांना सविधान आर्मी संघटना चे निवेदन

अघोषित लोडशेडिंग बंद होणे कामी जिल्हाधिकाऱ्यांना सविधान आर्मी संघटना चे निवेदन

नंदुरबार /फहिम शेख

सध्या जिल्हयात तापमानाने उच्चांक गाठला असुन पारा 44 डिग्रीवर पोहोचला आहे. तसेच या महिना पासुन मोठ्मोठे विविध धार्मिक सन उत्सव असुन मुस्लीम समाजाचा पवित्र रमजान मास सुरु आहे. ज्यात समाजातील लहान लहान बालके, प्रौढ माणसे तसेच वयोवृद्ध ही महिनाभर अन्न तर सोडा पाणीचे एक थेंब ही तोंडात घेत नसुन दिवसात सुमारे 14-14 तासाचे असे कडक उपवास ठेवतात.
अगोदरच covid-19 मुळे मोठ्या प्रमाणावर काय गरीब काय श्रीमंत सर्व लोकांची आर्थिक व मानसिक स्तिथी हलाकीची झालेली असुन जसे तसे बाजार चालत आहे. परंतु या अघोषित लोडशेडिंग मुळे बाजारावर ही दुष्परिणाम होत आहे. जिल्ह्यातील जनतेच्या वतीने विनंती करण्यात आली कि. एक महिन्याचा शुल्लक वीज बिल बाकी असल्यास गरीब कुटुंबाचे वीज कनेक्शन कट करण्याचे आदेश काडनारे विधुत मंडळाचे शूरवीर अधिकार्यांना आपण वरील बाबीवर सहानुभूतीपूर्वक विचार करून सदर अघोषित लोडशेडिंग बंद करणे बाबत त्वरीत आदेशित करावे, अश्या आशयाचे निवेदन पत्र सविधान आर्मी संघटना चे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष शेख फहिम महोम्मद जविद बागवान, अरिफ शेख, सुमैय शेख, किरण शिरसाट, शबाना सय्यद,कांचन निकुभे यांनी नंदुरबार जिल्हाधिकारी यांना दिले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button