Rawer

निंभोरा येथील रेल्वे विभागाच्या पाण्याच्या त्रासाबाबत व रस्त्याबाबत शेतकऱ्यांचे खासदार रक्षा खडसे यांच्याकडे निवेदन.

निंभोरा येथील रेल्वे विभागाच्या पाण्याच्या त्रासाबाबत व रस्त्याबाबत शेतकऱ्यांचे खासदार रक्षा खडसे यांच्याकडे निवेदन

रेल्वे प्रशासनाची मुजोरीची शेतकऱ्यांची तक्रार.

०९ मार्चला स्वतः पाहणी करणार-रक्षा खडसे.

निंभोरा- संदिप कोळी
येथील शेतक-यांची खिर्डी शिवारालगत असलेल्या जुन्या शिंगाडी रस्त्याला लागून शेती असून गेल्या ३०ते ४०वर्षात या रस्त्या ही दुरुस्ती झालीच नसून या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी यंसेच निंभोरा येथील रेल्वेस्थानकाला लागून सुरू असलेल्या उड्डाणपुलाच्या कामापासून या रस्त्यात रेल्वे प्रशासनाच्या काही अधिकाऱ्यांनी आडमुठेपणा करीत त्याच रस्त्यात पाणी सोडून दिल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत याबाबत रेल्वे प्रशासनाकडे वारंवार तक्रार करून ही त्यांचे सहकार्य लाभत नसल्याने हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांनी अखेर खासदार रक्षा खडसे यांनी निवेदन देत रस्ता दुरुस्ती व साचलेल्या पाण्याच्या विल्हेवाटीबाबत निवेदन दिले.यात दुर्लक्ष झाल्यास अखेर आंदोलन करण्याचे ही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
निंभोरा येथील शेतकऱ्यांची शेत जमीन खिर्डी शिवारात असून या शेतशिवारासाठी वापरासाठी असलेला जुना शिंगाडी रस्ता गेल्या ३०ते ४०,वर्षांपासून नादुरुस्त आहे. त्यातच सध्या या रस्याला लागून निंभोरा-खिर्डी रस्त्यावर रेल्वेउड्डाणपुलाच्या काम सुरू आहे त्यात रस्त्यात अनेक अडथळे असून रेल्वे प्रशासनानकडून त्याठिकाणी असलेले पाण्याचे पाईप काढून टाकल्याने त्याचे पाणी त्या नादुरुस्त रस्त्यात मोठ्या प्रमाणावर साचलेले आहे.या रस्त्यावर असलेल्या केळी उत्पादकांना प्रति केळीच्या घडांसाठी २०ते २६रुपयांपर्यंत वाहतूक द्यावी लागत असल्याने शेतकऱ्यांना अक्षरशः तोट्यात केळी विकावी लागत आहे.साचलेल्या पाण्यातून शेतकऱ्यांना वाट काढावी लागत असून हा रस्ता अत्यंत धोकादायक झालेला आहे.अशा वेळी रेल्वे प्रशासनाशी संबंधित अधिकाऱ्यांना याबाबत शेतकऱ्यांनी अनेकदा विनवणी केली मात्र त्यांनी मुजोर भूमिका घेत शेतकऱ्यांना हुसकावून लावले .याबाबत रस्ता दुरुस्तीसाठी व पाण्याच्या विल्हेवाट लावण्यासाठी अखेर खासदार रक्षा खडसे व माजी मंत्री एकनाथराव खडसे यांना निवेदन देण्यात आले.व रस्ता दुरुस्ती न झाल्यास आंदोलनाचा इशारा ही यावेळी शेतकऱ्यांतर्फे देण्यात आला.यावेळी निवेदन देतांना केळी उत्पादक शेतकरी पवन चौधरी,राष्ट्रवादीचे तालुका सरचिटणीस वाय डी पाटील,ग्रा पं सदस्य सतीश पाटील,जगन्नाथ दोडके,जितेंद्र चौधरी,सईद खाटीक,संतोष कोंडे,चंद्रकांत चौधरी,मयूर ब-हाटे,पवन अंबादास चौधरी आदी उपस्थित होते.
——
रेल्वेच्या आडमुठेपणामुळे केळी वाहतुकीत नुकसान-
या शेत रस्त्याला लागून रेल्वेकडून केळी वाहतुकीसाठी सहकार्य मिळत नसून उलट त्या रस्त्यात पाणी सोडल्याने आम्हाला २६रुपयांपर्यंत केळी वाहतूक द्यावी लागली.
श्री.डिगंबर चौधरी,
अध्यक्ष,तंटामुक्ती समिती,निंभोरा.
——–
०९ तारखेला प्रत्यक्ष भेट देणार-
येत्या ०९ मार्चला या रस्त्याला प्रत्यक्ष भेट देऊन विभागीय रेल्वे प्रबंधक यांना सोबत घेऊन पाहणी करून निर्णय घेऊ.
-खा.रक्षा खडसे,

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button