Shirdi

अगंगागिरी महाराजांनी समाजासाठी केलेले कार्य अलौकिक – महंत रामगिरी महाराज

अगंगागिरी महाराजांनी समाजासाठी केलेले कार्य अलौकिक – महंत रामगिरी महाराज

शिङी / प्रतिनिधी राहुल फुंदे

योगीराज गंगागिरी महाराज यांनी दोनशे वर्षापूर्वी दुष्काळात अन्नदान परंपरा सुरु केली होती.
अनेक साधु संतांनी लोकांच्या सेवेद्वारे देवाची उपासना करण्याचा मार्ग निवडला आहे.चालू प्रयत्न समाजातील जनजागृती केली,हे देवाच्या सेवेपेक्षा कमी नाही.असे प्रतिपादन महंत रामगिरी महाराज यांनी केले.

आज जगात कोरोना व्हायरस च्या महामारीत देशासह राज्यात लाॕक डाऊन सुरू असल्यामुळे हातावर पोट असणाऱ्या गोर गरीब जनतेची अन्न ,वस्र या मुलभुत गरजांची पुर्तता होत नसल्याने महंत रामगीरी महाराजांनी बेटपरिसरातील गंगथडी भागात अनेक गावामध्ये गहु,तांदुळासह वस्र व मास्क,वाटप केले.व अजून ही अनेक गावात गोर गरिबांना सराला बेट संस्थांनाच्या वतीने मदत केली जाणार आहे.पुढे बोलताना महंत रामगिरी महाराज म्हणाले,की, मानवता हाच खरा धर्म आहे. एकमेकांस सहाय करा, भूकेलेल्यांना अन्नदान करा, अतिथीना देवता माना, परस्परांबद्दल आदर बाळगा, तुम्हाला जिवनाचा खरा आनंद नक्की मिळेल. यापुढे सर्व भाविकांनी ईश्वरकार्यात जनसेवा हिच देवाची सेवा आहे. आणि तो देव गोर गरीबात शोधला पाहीजे, दिनदुबळ्याची सेवा ही देवाची सेवा आहे प्रत्येकजण आपल्या सभोवती आहे.
तर मग आपण प्रत्येक व्यक्तीमध्ये भगवंताचा भाग का पाहत नाही आणि त्यांची सेवा करून, आपण जसे आपल्या देवाची पूजा करतो अशी भावना करा,
भारतीय संस्कृतीत, देवाकडे खूप मोठी जागा आहे आणि मग आपण देवाची उपासना, उपवास, भक्ती आणि त्याची कृपा मिळविण्याच्या विविध मार्गांसाठी देवाची उपासना करतो.आपण हे सर्व शांती आणि आनंदासाठी करतो. परंतु आपण असहाय्य लोकांना मदत करण्यासाठी आलेल्या आनंदाची कल्पना केली आहे का? योगीराज गंगागिरी महाराज यांनी दोनशे वर्षापूर्वी दुष्काळात अन्नदान परंपरा सुरु केली होती.

अनेक साधु संतांनी लोकांच्या सेवेद्वारे देवाची उपासना करण्याचा मार्ग निवडला आहे.कोरोनो व्हायरस विषयी समाजातील जनजागृती करणे व गरज वंताना मदत करणे हे देवाच्या सेवेपेक्षा कमी नाही.असे महाराज म्हणाले .
याप्रसंगी नायब तहसिलदार भालेराव,विरगाव पोलीस ठाण्याचे सपोनि विश्वास पाटील,सराला बेटाचे विश्वस्त मधुकर महाराज,यांच्या सह बेटातिल विद्यार्थी ऊपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button