Pandharpur

पंढरपूर टेंभुर्णी रस्ता रुंदीकरणासाठी दिले खासदार निंबाळकर यांना निवेदन

पंढरपूर टेंभुर्णी रस्ता रुंदीकरणासाठी दिले खासदार निंबाळकर यांना निवेदन

प्रतिनिधी
रफिक आत्तार

माढा मतदार संघाचे कर्तव्यदक्ष खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना पंढरपूर करकम टेंभुर्णी या एन एच 561 नॅशनल हायवे चा रस्ता रुंदीकरण याबाबत भारतीय जनता पक्षाचे ओबीसी अध्यक्ष बाळासाहेब माळी यांनी निवेदन दिले आहे.
पंढरपूर ते टेंभुर्णी रोड रस्ता रुंदीकरण करण्यासाठी तसेच उड्डाणपूल वारकऱ्यांच्या दृष्टिने बायपासरोड होणे अत्यंत गरजेचे आहे कारण टेंभुर्णी करमाळा अहमदनगर रुंदीकरण जहरीले आहे तसेच पंढरपूर मंगळवेढा चढचण विजापूर या रस्त्याचे रुंदीकरण झालेले आहे या रस्त्यावरून श्री संत निवृत्ती महाराज श्री संत एकनाथ महाराज श्री संत निळोबाराय महाराज व इतर अनेक संस्थांच्या दिंडी पालखी जात असून या सर्व दिंड्या विभाजन करून चालत असल्यामुळे त्यांची संख्या कमी असली तरी लगतच्या गावाकडून आढावा घेतल्यास श्री संत ज्ञानेश्वर श्री संत तुकाराम महाराज पालखी पेक्षा जास्त लोक येत आहेत या रस्त्यावरून दिल्ली ते बेंगलोर जड वाहने आणि लहान वाहने जात असल्याने त्याचबरोबर 7 साखर कारखान्याची कार्यक्षेत्र या रस्त्यावरून असून रस्ता अरुंद असल्यामुळे वाहतुकीचे प्रमाण जास्त आहे त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे खासदार म्हणून आपण लक्ष घालून वरिष्ठ पातळीवरून रस्त्याचे काम मार्गी लावावे ही बऱ्याच दिवसाची मागणी आपल्या माध्यमातून पूर्ण व्हावी अशी अपेक्षा या परिसरातील मतदार नागरिक व्यक्त करीत असल्याचे बाळासाहेब माळी यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button