Dharangaw

धरणगाव तालुका प्रोटान संघटने कडून मा.तहसीलदार नितीनकुमार देवरे साहेब यांना निवेदन…..

धरणगाव तालुका प्रोटान संघटने कडून मा.तहसीलदार नितीनकुमार देवरे साहेब यांना निवेदन…..

रजनीकांत पाटील

धरणगांव. दि. २५ सप्टेंबर , २०२० शुक्रवार रोजी माझे कुटुंब ,माझी जबाबदारी’ या मोहिमे अंतर्गत सर्वेक्षणात शिक्षकांना ड्युटी न देणेबाबत निवेदन आर.एम.बी.के.एस. आणि प्रोटान तर्फे मा.तहसीलदार सो. मा. नितीनकुमार देवरे साहेब यांना देण्यात आले.

या निवेदनात कोविड १९ च्या पार्श्वभूमीवर शासनाने लागू केलेल्या लॉकडॉऊन कालावधीत ही राष्ट्रीय आपत्ती निवारण्यासाठी राज्यातील शिक्षकांनी इतर कर्मचाऱ्यांच्या बरोबरीने आवश्यक ती सर्व सेवा दिलेली आहे. चेकपोस्ट ड्युटी, सर्वेक्षण, राशन वाटप व अन्य जोखमीच्या जबाबदाऱ्या शिक्षकांनी शासन आदेशाप्रमाणे वेळोवेळी पार पाडलेल्या आहेत. या जोखमीच्या ड्युट्या बजावत असताना अनेक शिक्षकांना आपला जीव गमवावा लागला आहे.या परिस्थितीही शिक्षकांनी शासन आदेशाप्रमाणे आणि राष्ट्रीय आपत्तीत राष्ट्रीय कर्तव्याचा भाग म्हणून प्रामाणिकपणे , सेवाभावी वृत्तीने कोविड-१९ ड्युटी बजावलेली आहे.
शिक्षकांना आपले ऑनलाईन शैक्षणिक कामकाज नियमितपणे व सातत्याने पूर्ण करता यावे व विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी कोविड १९ च्या संबंधीत कार्यासाठी सेवा अधिग्रहित केलेल्या शिक्षकांना, कोविड १९ च्या संबंधित कामकाजातून मुक्त करण्यात यावे अशा प्रकारचे आदेश शासनाने उपरोक्त दिनांक १७/०८/२०२० ला दिलेले आहेत. असे असतानाही जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्रशासनाकडून उपरोक्त शासन आदेश डावलून शिक्षकांना “माझे कुटुंब माझी जबाबदारी” या मोहिमे अंतर्गत सर्वेक्षण ड्युटी दिली जात आहे. आणि आपत्ती व्यवस्थापन कायद्याच्या कारवाईचा दबाव आणून सर्वेक्षण करण्यास सक्ती केली जात आहे. याचा संघटनेने विरोध दर्शविला आहे. शिक्षक ऑनलाईन माध्यमातून उपलब्ध साधन सुविधांचा वापर करून विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचे कार्य करीत आहेत. शिक्षकांना कोविड सर्वेक्षणाची ड्युटी देण्यासाठी कोणतीही सूचना अथवा निर्देश शासनाने दिलेले नाहीत. त्या ऐवजी पर्यायी व्यवस्था शासनाने सदर आदेशात सुचविलेली असताना बळजबरीने शिक्षकांना त्यांच्या नियमित कामापासून वंचित करून, विद्यार्थी-पालक समाज यांचे शैक्षणिक,आर्थिक नुकसान करणारे व शिक्षकांना वेठीस धरून या सर्वांवर अन्याय अत्याचार करणारे आहे.

प्राध्यापक – शिक्षकांनी सर्वेक्षणाची ड्युटी केली नाही तर आपत्ती व्यवस्थापन कायद्याखाली त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल अशा प्रकारचा दबाव शिक्षकांवर टाकला जात आहे. ही मोहीम पूर्णपणे लोकप्रतिनिधींनी नामनिर्देशित केलेल्या स्वयंसेवकांच्या माध्यमातून आणि जनसहभागातून राबवायची योजना आहे. तसेच अंगणवाडी सेविकांनाही या अंतर्गत सर्वेक्षणाच्या ड्युट्या देण्यात येऊ नयेत. असे म्हटले आहे.

वरील आशयाचे धरणगाव तहसीलदार सो. नितीनकुमार देवरे साहेब यांना देण्यात आले .निवेदन प्रोटानचे जिल्हा सचिव मिलिंद निकाम , प्रोटान चे तालुका अध्यक्ष सुनील देशमुख, बामसेफ चे तालुका अध्यक्ष पी.डी.पाटील, हेमंत माळी , लक्ष्मण पाटील , आबासाहेब राजेंद्र वाघ , गौतम गजरे, तसेच धरणगाव तालुका प्रोटान टीम , श्री सतीश शिंदे , हर्षल चौधरी , राकेश पावरा , राहुल चव्हाण. आदी उपस्थित होते

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button