Chandrapur

महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस पुरस्कृत ‘मदतीचा एक घास’ या उपक्रमाला प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची सदिच्छा भेट महिला कार्यकर्त्यांचे केले कौतुक आणि अभिनंदन

महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस पुरस्कृत ‘मदतीचा एक घास’ या उपक्रमाला प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची सदिच्छा भेट महिला कार्यकर्त्यांचे केले कौतुक आणि अभिनंदन

चंद्रपूर : महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस च्या अध्यक्षा संध्या सवालाखे आणि कार्याध्यक्ष प्रणिती शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण महाराष्ट्रात कोविड काळातील गरजूंसाठी ‘मदतीचा एक घास’ हा उपक्रम सुरू आहे. चंद्रपूर महिला काँग्रेस कडून मागच्या २५ दिवसांपासून जिल्हा सामान्य रुग्णालयात अन्नदान उपक्रम सुरू आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले काल पासून चंद्रपूर दौऱ्यावर आहेत. या दौऱ्या दरम्यान त्यांनी आज सकाळी ‘मदतीचा एक घास’ उपक्रमाला सदिच्छा भेट दिली. या वेळी उपस्थित असलेल्या गरजूंची प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आस्थेने विचारपूस केली. महिला काँग्रेस च्या पदाधिकर्यांचे कौतुक पटोले यांनी यावेळी केले. महिलांनी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे स्वागत रोपटे देऊन केले व प्रदेशाध्यक्षांना स्वतःच्या हाताने बनवून आणलेला फराळ भेट म्हणून दिला. या वेळी नम्रता आचार्य ठेमस्कर यांनी नाना पटोले यांना ‘मदतीचा एक घास’ या उपक्रमाची माहिती दिली. सोबत चंद्रपूर महिला काँग्रेस कडून कोविड काळात करण्यात आलेल्या कामाचा अहवाल दिला. या कार्यक्रमाला माजी आमदार अविनाश वारजूरकर, काँग्रेसचे ग्रामीण जिल्हा अध्यक्ष ग्रामीण प्रकाश देवतळे, शहर जिल्हा अध्यक्ष रामू तिवारी, गडचिरोली जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्र ब्राहणवाडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिनेश चोखारे, राजेशसिंह चौहाण, कुणाल चहारे,गोपाल अमृतकर बल्लारपूर तालुका महिला काँग्रेस च्या अध्यक्षा अफसना सययद, बल्लारपूर शहर काँग्रेस च्या अध्यक्षा मेघा भाले, जिल्हा उपाध्यक्षा सुनीता धोटे, ब्लॉक अध्यक्ष शीतल काटकर, जिल्हा उपाध्यक्षा हर्षा चांदेकर, शहर उपाध्यक्षा स्वाती त्रिवेदी, शहर सचिव वाणी डारला, सदस्य लता बारापात्रे यांची उपस्थिती होती.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button