Ahamdanagar

नाशिकच्या शिवपुत्र संभाजीराजे बहुउद्देशीय संस्थेतर्फे दिला जाणारा राज्यस्तरीय “शिवपुत्र महाराष्ट्र गौरव पुरस्कार” प्रसिद्ध उद्योजक बापुसाहेब मारुती नजन यांना प्रदान!

नाशिकच्या शिवपुत्र संभाजीराजे बहुउद्देशीय संस्थेतर्फे दिला जाणारा राज्यस्तरीय “शिवपुत्र महाराष्ट्र गौरव पुरस्कार” प्रसिद्ध उद्योजक बापुसाहेब मारुती नजन यांना प्रदान!

अहमदनगर प्रतिनिधी

नाशिक जिल्ह्यातील शिवपुत्र छत्रपती संभाजी राजे बहुउद्देशिय संस्थेतर्फे दिला जाणारा राज्यस्तरीय शिवपुत्र महाराष्ट्र गौरव पुरस्कार या वर्षी बापुसाहेब मारुती नजन यांना अहमदनगर येथील झोपडी कँटीन जवळच्या माउली सभागृहात प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून पद्मश्री पोपटराव पवार, नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सुधीरजी तांबे,नागेबाबा मल्टीस्टेटचे अध्यक्ष कडुभाउ काळे,प्रसिद्ध चित्रकार प्रमोदजी कांबळे,शहिद जवानाची वीरपत्नी वैशाली योगेश धामणे,हे उपस्थित होते. प्रारंभी संस्थेचे अध्यक्ष जगन्नाथ पाटील यांनी प्रास्ताविकात संस्थेच्या कार्याचा आढावा घेतला.आणि उपस्थित मांन्यवरांचा सौ. अर्चना पाटील यांच्या सह सन्मान केला.यावेळी वेगवेगळ्या क्षेत्रातील एकुण आकरा जणांना हे पुरस्कार वितरीत करण्यात आले. प्रसिद्ध उद्योजक बापुसाहेब नजन यांना आदर्श उद्योजक म्हणून “शिवपुत्र महाराष्ट्र गौरव पुरस्कार” प्रदान करण्यात आला. नजन हे मुळचे पाथर्डी तालुक्यातील शिराळ या गावचे रहिवासी आहेत.परंतु पंचवीस रुपये रोजाने खाजगी कंपनीत काम करणाऱ्या बापुसाहेब नजन यांनी अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील भेंडे बुद्रुक येथे नागेश्वर इंडस्ट्रीजची स्थापना करून त्याची पाळमुळ संपूर्ण महाराष्ट्रात रुजवून आपल्या उद्योगात यशस्वी भरारी घेत हा बहुमान मिळवला आहे.आपल्या यशस्वी जिवनात साथ देणारी यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते ती स्त्री म्हणजे त्यांची पत्नी सौ सुरेखा नजन,आई-लताबाई नजन, वडील- मारुती नजन,आजी- गयाबाई नाचन,भाउ- बाबासाहेब नजन यांचाही या पुरस्कारात सिंहाचा वाटा आहे. या कार्यक्रमास ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे माजी संचालक जेष्ठ नेते निव्रुत्ति पाटील दातीर, जालन्याच्या रामेश्वर साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक एकनाथ कोलते,अशोक मिसाळ,मच्छिंद्र शिपनकर,रखमाजी नाचन,लक्ष्मण नजन,यशवंतराव मिसाळ, दिलिप ढवण,किशोर मिसाळ,यांच्या सह संपूर्ण महाराष्ट्रातून अनेक मांन्यवर या पुरस्कार वितरण सोहळ्यास
उपस्थित होते. सुत्रसंचालन उद्धव काळपहाड यांनी तर आभार जगन्नाथ माधवराव पाटील यांनी मानले.प्रतिनिधी सुनिल नजन अहमदनगर

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button