Usmanabad

उस्मानाबाद, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ४४८ पदे भरण्यास राज्य शासनाची मान्यता

उस्मानाबाद, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ४४८ पदे भरण्यास राज्य शासनाची मान्यता
उस्मानाबाद : उस्मानाबाद येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रथम वर्षाकरीता १०० विद्यार्थ्यांचे प्रवेश शैक्षणिक वर्ष २०२१-२२ पासून सुरू होणार आहे. येथील अध्यापकांची पदे तातडीने भरणे आवश्यक होते. त्याअनुषंगाने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ४४८ पदे भरण्यास राज्य शासनाची मान्यता मिळाली आहे. त्यानुसार वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यासाठी एकूण ४ टप्यात गट-अ ते गट-क मधील नियमित १८५ पदे, विद्यार्थी पदे ५९ , त्याचप्रमाणे गट-क काल्पनिक पदे १३९ बाह्यस्रोताने व गट-ड काल्पनिक पदे ६५ (बाह्यस्रोताने) अशी एकूण ४४८ पदे निर्माण करण्यास शासन निर्णय २७ मे २०२१ अन्वये मान्यता देण्यात आली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख आणि संचालक, वैद्यकीय शिक्षण व संशोधन, मुंबई यांच्याकडे डॉ. आ. तानाजीराव सावंत , पालकमंत्री शंकरराव गडाख, खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आ. कैलास पाटील आ. ज्ञानराजजी चौगुले यांच्यासमवेत शिफारस केली होती. उस्मानाबाद येथील १०० विद्यार्थी क्षमतेच्या ४३० खाटांचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्यास १३ जानेवारी २०२१ रोजीच्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली होती.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button