sawada

कोरोना महामारीमुळे बंद केलेल्या न्हावी-फैजपूर व सावदा खिरोदा बसेस सुरू करा – युवासेना सावदा प्रसिद्धीप्रमुख अभय पाटील

कोरोना महामारीमुळे बंद केलेल्या न्हावी-फैजपूर व सावदा खिरोदा बसेस सुरू करा – युवासेना सावदा प्रसिद्धीप्रमुख अभय पाटील

“विद्यार्थ्यांची ये-जा करण्याची गैरसोय होत असल्याने युवासेनेचा पुढाकार.यावल आगारप्रमुख यांनी लवकरच बसेस सुरू करण्याचे सांगितले.”

सावदा प्रतिनिधी युसूफ शाह

सावदा :- जळगांव जिल्ह्यातील रावेर तालुक्यात असलेल्या नावी फैजपूर, सावदा खिरोदा, हे एसटी बसेस फेऱ्या कोरोना महामारी मुळे बंद करण्यात आल्या होत्या. मात्र कोरोनाचे नियम थोडे शिथिल झाले असल्याने शाळा , महाविद्यालय सुरू होऊन बरेच दिवस झाले आहेत.तरी काही सदर खेड्यातून विद्यार्थ्यांना येण्या-जण्यासाठी बस सुरू झाल्या नसल्याने विद्यार्थ्यांची फजिता व त्यांची गैरसोय होत असल्याने या मार्गाचे बसेस त्वरित विद्यार्थ्यांकरीता शाळा आणि महाविद्यालय येथे जाण्यासाठी सुरू करावे,यासाठी यावल आगार प्रमुख भालेराव साहेब यांना सोशल मीडिया द्वारा निवेदन देऊन युवा सेनेचे प्रसिद्धी प्रमुख यांनी मागणी केली आहे.

तसेच याबाबत राज्याचे परिवहन मंत्री यांच्या सह मुक्ताईनगर मतदार संघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांना निवेदनाच्या प्रति देखील पाठवण्यात आल्या आहे.
न्हावी ते फैजपूर व सावदा खिरोदा बसेच आणि ज्या विद्यार्थ्यांच्या हितासाठी पूर्वी पासून बसेस सुरू आहेत,त्या कोरोना काळात शाळा बंद असल्याने बसही बंद केलेल्या आहेत.त्या त्वरित सुरू कराव्या जेणे करून विध्यार्थ्यांची गैरसोय होणार नाही.विद्यार्थी हिताची काळजी घेऊन लवकरच आपण सदरील एसटी बसेस सुरू कराव्या.अशी रास्त मागणी युवासेना सावदा शहर प्रसिद्धीप्रमुख अभय श्यामकांत पाटील यांनी केली आहे.तसेच निवेदन दिल्यानंतर यावल आगाराप्रमुख भालेराव साहेब यांनी लवकरात लवकर बसेस सुरू करू असे कळवले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button