कसोदा

कासोदा येथे शासकीय कापूस खरेदी केंद्र सुरू

कासोदा येथे शासकीय कापूस खरेदी केंद्र सुरू

खासदार उन्मेश दादा पाटील यांच्या प्रयत्नातून खरेदी केंद्र सुरू…शेतकऱ्यांनी व्यक्त केला आनंद

मनोज भोसले
कसोदा —– या परिसरात सी सी आय अंतर्गत पणन च्या माध्यमातून शासकीय कापूस खरेदी केंद्र येथील भवानी जिनिग अँड प्रेसिग येथे सुरू झाले असून त्याचा शेतकरी बांधवांनी लाभ घेण्यासाठी चांगल्या प्रतीचा माल आणून अधिकाधिक भाव आपल्या पदरी कसा पाडता येईल यासाठी प्रयत्न करावेत. *शेतकऱ्यांच्या सोयीसाठी हे केंद्र तातडीने सुरू केले असून त्याचा लाभ घ्यावा. असे आवाहन खासदार उन्मेष दादा पाटील यांनी उद्घाटन प्रसंगी केले.*
*खासदार उन्मेष दादा पाटील यांच्या प्रयत्नाने हे केंद्र मंजूर झाले असल्याचे व विशेष म्हणजे खासदार उन्मेश दादा पाटील यांनी वरपर्यंत पाठपुरावा केल्यामुळेच हे शक्य झाल्याचे जिनिंगचे मालक तथा माजी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष मच्छिंद्र बापू पाटील यांनी आपल्या भाषणात सांगितले.*
यावेळी पणनचे विभागीय व्यवस्थापक हुले साहेब यांनी कापसाच्या ग्रेड पद्दत व आद्रता व त्या नुसार भाव कसा मिळेल यासंदर्भात मार्गदर्शन केले. पहिल्या ग्रेडला 5500 चा भाव शेतकऱ्यांना मिळणार आहे त्या अनुषंगाने कोरडा व चांगल्या प्रतीचा माल शेतकरी बांधवांनी आणावा अशा सूचना यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना केल्या . तसेच पणन चे संचालक तथा जिल्हा बँकेचे संचालक संजय पवार,शेतकी संघाचे चेअरमन रमेश राजाराम पाटील, जी प सदस्य नाना महाजन यांनी देखील आपल्या मनोगतात शेतकऱ्यांना अधिकाधिक कापूस शासकीय केंद्रावर आणावा असे आवाहन केले.
या कार्यक्रम प्रसंगी जी प अध्यक्षा नामदार उज्वलाताई पाटील,मार्केट कमिटी चे संचालक रामनाथ पाटील, माजी सभापती गबाजी पाटील, भाजपचे ओ बी सी जिल्हाध्यक्ष अशोक चौधरी, बीजेपी उद्योग आघाडीचे सचिन विसपुते, सरपंच भैय्या राक्षे, माजी सभापती बापू गदिकर, सेनेचे तालुका प्रमुख वासुदेव पाटील, हाजी तैय्याब अली, प्रगतिशील शेतकरी छबु नाना चौधरी, तसेच परिसरातील सरपंच, व पदाधिकारी, शेतकरी, व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन ह भ प जमादार सर यांनी केले.

Leave a Reply

Back to top button