Malkapur

जलसंजीवनी प्रकल्पा अंतर्गत स्टॅन्डर्ड चार्ट बेकेच्या वित्तीय सहयोगाने स्प्रिंकलर सेटचे पहिल्या टप्प्यातील वितरण कार्यक्रम संपन्न

जलसंजीवनी प्रकल्पा अंतर्गत स्टॅन्डर्ड चार्ट बेकेच्या वित्तीय सहयोगाने स्प्रिंकलर सेटचे पहिल्या टप्प्यातील वितरण कार्यक्रम संपन्न

रजनीकांत पाटील

सुर्डी- कृषि विकास व ग्रामीण प्रशिक्षण संस्था,मलकापूर युनायटेड व्ये मुंबई व स्टॅन्डर्ड चार्ट बेक कर्मचाऱ्याच्या वित्तीय सहयोगाने जलसंजीवणी दुष्काळ सज्जता उपक्रम अंतर्गत प्रकल्पातील समाविष्ट सुर्डी यावली इर्ले उंडेगाव व रस्तापूर गावातील अल्पभूधारक शेतकरी कुटुंबासाठी स्प्रिंकलर सेट वितरणाचे कार्य हे भोगावती जलसंजीवणी कृषि विकास महिला उत्पादक कंपनी लि. यांच्या वतीने संपन्न.

जलसंजीवणी दुष्काळ सज्जता उपक्रम हा मागील तीन वर्षा पासून बार्शी तालुक्यातील पाच गावात कृषि विकास व ग्रामीण प्रशिक्षण संस्था, मलकापूर यांच्या वतीने अमलबजावणी करण्यात येत आहे या प्रकल्पा साठी जॉन डियर प्रा.इ.लि. अर्थसाह्यता करते असून युनायटेड व्ये मुंबई यांची संकल्पना आधारित हा प्रकल्प कार्य करत आहे. प्रकल्प मार्गदर्शिके प्रमाणे गावातील लोकांचे राहणीमान उंचावण्यासाठी जलसंधारण, कृषि व्यवस्थापन, कृषि आधारित उपजीविका, शिक्षण व प्रशिक्षण , जनावरांचे व्यवस्थापन व स्वछता या विषयी प्रकल्पा अंतर्गत कार्य केल्या जातात त्याच बरोबर प्रकल्पा बाहेरील शासकीय- निमशासकीय साह्यातून गावातील गरजू लाभार्थी यांच्या विकासासाठी प्रकल्प हा प्रयत्न करतो आहे या साठी प्रकल्पातील 150 अल्पभूधारक शेतकरी कुटुंबा करीता अभिसरण प्रक्रियेच्या माध्यमातून स्प्रिंकलर सेट वितरण करण्यासाठी कृषि विकास संस्था व ग्रामीण प्रशिक्षण संस्था व युनायटेड व्ये मुंबई यांनी पुढाकार घेत स्टॅन्डर्ड चार्ट बेक कर्मचाऱ्याच्या वित्तीय सहयोगाने या ठिकाणी अभिसरण कार्याच्या माध्यमातून सुर्डी गावातील 10 लाभार्थी कुटुंबाना पहिल्या टप्यातील स्प्रिंकलर सेट वितरण हे भोगावती जलसंजीवणी कृषि विकास महिला उत्पादक कंपनी लि च्या अध्यक्ष नीता शेळके यांच्या वतीने करण्यात आले. तसेच पुढील काही दिवसात उर्वरित सेट वाटप करण्यात येणार आहेत.

या वितरण कार्यक्रमाच्या वेळी भोगावती जलसंजीवणी प्रकल्प व्यवस्थापक मोशिन शेख, भीमाशंकर ढाले , राहील पाटील, समीर शेख, गोपाळ थडके अनुराधा गायकवाड, शेतकरी उत्पादक कंपनी अध्यक्ष नीता शेळके व शेतकरी लाभार्थी उपस्थित होते.

Leave a Reply

Back to top button