Rawer

मोठा वाघोदा एकता महिला ग्राम संघातर्फे आयोजित नवरात्री विशेष फराळाचे स्टॉल

मोठा वाघोदा एकता महिला ग्राम संघातर्फे आयोजित नवरात्री विशेष फराळाचे स्टॉल

मुबारक तडवी रावेर

रावेर : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती ग्रामसंघ वाघोदा बु. संविधान महिला स्वयंसहाय्यता समुह उत्पादित स्वयंनिर्मीत केळी पासून तयार केलेली विविध खाद्यपदार्थ विक्री स्टॉल चे सरपंच मुबारक ( राजू) अलिखा तडवी , उपसरपंच लक्ष्मीकांत बाजीराव चौधरी माजी सरपंच तथा विद्यमान सदस्य कालू मिस्तरी यांचे हस्ते शुभारंभ करण्यात आले
आज गणेश नगर वाघोदा बु येथे एकता महिला ग्राम संघातर्फे आयोजित नवरात्री विशेष फराळाचे स्टॉल केळी पासून बनवलेले पदार्थ केळीचे चिप्स, केळीचे लाडू,केळीचा चिवडा , केळीच्या चकल्या, केळीचे पापड, केळीचे शेव, इत्यादी स्टॉलचे उद्घाटन करताना मा. सरपंच मुबारक (राजू) तडवी ,उपसरपंच लक्ष्मी कांत चौधरी तसेच कालू मिस्तरी , तालुका व्यवस्थापक अंकुश जोशी सर प्रभाग समन्वयक महेंद्र वाघ सर विकास शेंडकर सर अशोक जयभाये सर नारीशक्ती प्रभाग संघाच्या सचिव प्रतिभाताई पाटील CRP कल्पना वाघ अर्चना घाटे बँक सखी उर्मिला वाघ आर्थिक साक्षरता सखी संगमित्रा वाघ कार्यक्रमास उपस्थित होते

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button