Nandurbar

St Employee Strike | नंदुरबार जिल्ह्यातील शेकडो संपकरी एसटी कामगार मुंबईसाठी रवाना…

St Employee Strike | नंदुरबार जिल्ह्यातील शेकडो संपकरी एसटी कामगार मुंबईसाठी रवाना…

नंदुरबार फहिम शेख

एसटी महामंडळाचे सरकारमध्ये विलिनीकरण करावे मागणीसाठी राज्यभरातील एसटी कामगार आक्रमक झाले असून आंदोलन करत आहे. तर नंदुरबार जिल्ह्यातील शेकडो एसटी कामगार उद्या होणाऱ्या मोर्चासाठी मुंबईसाठी निघाले आहेत. त्यामुळे नंदुरबार जिल्ह्यातील बससेवा तिसऱ्या दिवशीही ठप्प राहणार असून प्रवाशांचे हाल होणार आहेत.

लढा विलिनीकरणाचा यासाठी एसटी कामगार आक्रमक झाले असून त्याचा पडसाद नंदुरबार जिल्ह्यातही उमटला आहे. नंदुरबार जिल्ह्यातील शेकडो एसटी कामगार उद्या होणाऱ्या मोर्चासाठी मुंबईसाठी निघाले आहेत. संपातून कोणताही तोडगा न निघाल्याने नंदुरबार जिल्ह्यातील बससेवा तिसऱ्या दिवशीही ठप्प राहणार असल्याने सर्वसामान्य प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल होणार. सर्वाधिक फटका नोकरदार आणि विद्यार्थ्यांना आणि परराज्यात जाणाऱ्या प्रवाश्यांना बसणार आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button