India

Sports: टोकियो ऑलम्पिक मध्ये सुवर्णपदक पटकविणाऱ्या अवनी आणि कृष्णा ची खेलरत्न पुरस्कारासाठी शिफारस..!

Sports: टोकियो ऑलम्पिक मध्ये सुवर्णपदक पटकविणाऱ्या अवनी आणि कृष्णा ची खेलरत्न पुरस्कारासाठी शिफारस..!

राजस्थान टोकियो पॅरालिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकून देशाचा मान उंचावणाऱ्या अवनी लेखरा आणि कृष्णा नागर यांच्या नावांची राजस्थान सरकारने मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारासाठी शिफारस केली आहे. अवीनने 10 मीटर एअर पिस्तूलमध्ये सुवर्णपदक जिंकले होते, तर 50 मीटर एअर रायफलमध्ये भारतीय नेमबाजाने कांस्यपदक पटकावले होते. तर कृष्णाने देशाला बॅडमिंटनमध्ये सुवर्णपदक मिळवून दिले होते. एकाच राज्यातील दोन खेळाडूंना खेलरत्नसाठी शिफारस करण्याची ही पहिलीच वेळ आहे.
राजस्थानकडून राजवर्धन सिंह आणि देवेंद्र झाझरिया यांना खेळरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. 2005 मध्ये सुवर्णपदक जिंकल्याबद्दल राजवर्धनला आणि 2018 मध्ये देवेंद्रला देशातील सर्वोच्च क्रीडा पुरस्कार देण्यात आला. अवनीने तिच्या नावाची शिफारस केल्याबद्दल प्रचंड आनंद व्यक्त केला असून ती शब्दात वर्णन करू शकत नसल्याचे तिने सांगितले. तर, खेळरत्नसाठी मुलाच्या नावाची शिफारस केल्याने कृष्णाचे वडीलही खूश आहे आणि त्यांनी कृष्णाच्या मेहनतीला श्रेय दिले आहे. अवनी ही पॅरालिम्पिकमध्ये भारतासाठी सुवर्णपदक जिंकणारी पहिली भारतीय महिला खेळाडू होती आणि तिच्या ऐतिहासिक कामगिरीचे सर्वत्र कौतुक झाले.

कृष्णा नागरने बॅडमिंटनमध्ये देशाला सुवर्णपदक मिळवून दिले होते. त्याने अंतिम फेरीत हाँगकाँगच्या चू मान काईचा 21-17, 16-21, 21-17 असा पराभव करून सुवर्णपदक जिंकले. या वर्षी टोकियो पॅरालिम्पिकमध्ये भारताची कामगिरी उत्कृष्ट होती आणि देशाने एकूण 19 पदके जिंकली. पॅरालिम्पिकमधील ही भारताची आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी होती. या 19 पदकांमध्ये 5 सुवर्ण, 8 रौप्य आणि 6 कांस्य पदकांचा समावेश आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button