Nanded

महाविकास आघाडीने पुकारलेल्या भोकर बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद

महाविकास आघाडीने पुकारलेल्या भोकर बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद

गोविंद सुर्यवंशी नांदेड

नांदेड : उत्तर प्रदेश मधील लखीमपुर खिरी येथे केंद्रातील गृह राज्यमंत्री असलेल्या मिश्रा यांच्या मुलांनी शेतकऱ्यांवर गाड्या घालुन आठ जिवे मारल्या नंतर ही त्यास अटक न करत असल्यामुळे महाराष्ट्रात महाविकास आघाडी कडुन महाराष्ट्र बंद पुकारण्यात आला.यात भोकर बंद करण्यात आले असून बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे.
आज दि.११ रोज सकाळ पासुनच काँग्रेस, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाराष्ट्र महाविकास आघाडीचे कार्यकर्ते भोकर येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकात जमुन रस्त्याने जात दुकाने बंद करण्याचे आव्हान केले.यात भोकरचे व्यापारी, दुकानदार,हाटेल, किराणा दुकान आदी कडकडीत बंद पाळण्यात आले.यावेळी ” मोदी सरकार हाय हाय”,वाह रे मोदी तेरा खेल,मस्ती दारु महेंगा तेल, ” महाविकास आघाडी चा विजय असो”, लखिमपुर येथील शेतकरी हत्येचा निषेध असो अशा घोषणा देण्यात आल्या.यावेळी काँग्रेसचे अध्यक्ष जगदीश पाटील भोसीकर, शिवसेनेचे सुभाष नाईक किनीकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष विश्वंभर पवार,सतीष देशमुख, गोविंद बाबा गौड,विनोद पाटील चिंचाळकर,खाजुबाई इनामदार, काँग्रेस पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष भगवानराव दंडवे,मनोज गिमेकर, गणेश राठोड अप्पाराव राठोड साहेबराव सोमेवाड बाबुराव साळकर रामचंद्र मुसळे माधव अमृतवाड निळकंठ वर्षवार प्रदीप दवलतदार साहेबराव भोंबे बालाजी एलपे रमेश महागावकर सुनील चव्हाण आनंद चिट्टे डॉ फिरोज इनामदार रंगराव पाटील सना इनामदार ताहेर बेंग आदिनाथ चिंताकुठे शिवाजी देवतळे सुरेश बिलेवाड राजु पाटील दिवसीकर यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button