Bhusawal

? भुसावळ सुरत दरम्यान उद्यापासून विशेष रेल्वे धावणार…!

? भुसावळ सुरत दरम्यान उद्यापासून विशेष रेल्वे धावणार…!

जळगाव : भुसावळ-सुरत व भुसावळ-नंदुरबार येथे जाण्यासाठी २ मार्चपासून आता भुसावळहून दररोज गाड्यांचे आयोजन करण्यात आले आहे. तर भुसावळ-बांद्रा टर्मिनसदरम्यान सात मार्चपासून त्रिसाप्ताहिक गाडी सुरू करण्यात येणार आहे. यात गाडी क्रमांक ०९०१४, गाडी क्रमांक ०९००८ व गाडी क्रमांक ०९०७८ या विशेष गाड्यांचे आरक्षण सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांत संकेतस्थळावर सुरू करण्यात आले आहे. गाडी क्रमांक ०९०१४ अप विशेष गाडी ७ मार्चपासून दर मंगळवार, गुरुवार, रविवार या दिवशी भुसावळहून सायंकाळी ५.४० वाजता सुटून दुसर्‍या दिवशी सकाळी बांद्रा टर्मिनसला पहाटे ४.३० वाजता पोहोचेल. गाडी क्रमांक ०९०१३ डाऊन ही गाडी ७ मार्चपासून दर मंगळवार, गुरुवार, रविवार या दिवशी बांद्रा टर्मिनसहून मध्यरात्री १२.२० वाजता सुटून त्याच दिवशी भुसावळला दुपारी १२ वाजता पोहोचेल.

भुसावळ-सुरत उद्यापासून रोज विशेष रेल्वे धावणार या दोन्ही गाड्या जळगाव, धरणगाव, अमळनेर, नरडाणा, शिंदखेडा, दोंडाईचा, नंदुरबार, नवापूर, बारडोली, भेस्तान, नवसारी, बलसाड, पालघर, विरार, बोरिवली या स्थानकांत थांबतील. या गाड्यांची १ द्वितीय वातानुकूलित, २ तृतीय वातानुकूलित, ६ शयनयान, ६ द्वितीय आसन श्रेणी अशी संरचना राहील. भुसावळ-सुरत दररोज विशेष गाडी : गाडी क्रमांक ०९००८ अप विशेष गाडी २ मार्चपासून दररोज भुसावळहून रात्री ८.२९ वाजता सुटून ही गाडी दुसर्‍या दिवशी सकाळी सुरतला सकाळी ६ वाजता पोहोचेल. गाडी क्रमांक ०९००७ डाऊन ही गाडी १ मार्चपासून पुढील सूचना मिळेपर्यंत दररोज सुरतहून सायंकाळी ५ वाजता सुटून दुसर्‍या दिवशी भुसावळला रात्री १.३० वाजता पोहोचेल. या दोन्ही गाड्या जळगाव, धरणगाव, अमळनेर, नरडाणा, शिंदखेडा, दोंडाईचा, नंदुरबार, खांडबारा, नवापूर, उकाई, सोनगढ, व्यारा, मढी, मॅन्ग्रोला, बारडोली, गंगाधरा, बागुमरा, चलथान, उधना या स्थानकांत थांबेल. या गाड्यांची ३ शयनयान, १२ द्वितीय आसन श्रेणी अशी संरचना राहील. भुसावळ-नंदुरबार दैनिक विशेष गाडी : गाडी क्रमांक ०९०७८ अप विशेष गाडी २ मार्चपासून दररोज भुसावळहून सकाळी ९ वाजता सुटून ही गाडी त्याच दिवशी नंदुरबार येथे दुपारी १.४० वाजता पोहोचेल. तर गाडी क्रमांक ०९०७७ डाऊन ही गाडी २ मार्चपासून दररोज नंदुरबारहून दुपारी २.३० वाजता सुटून आणि त्याच दिवशी भुसावळला सायंकाळी ७.२० वाजता पोहोचेल. या दोन्ही गाड्या जळगाव, पाळधी, चावलखेडा, धरणगाव, टाकरखेडा, अमळनेर, भोरटेक, पाडसे, बेटावद, नरडाणा, होळ, शिंदखेडा, विखरण, दोंडाईचा, रनाळा, तिसी, चौपाळे या स्थानकांत थांबतील. या गाडीत ३ शयनयान, १२ द्वितीय आसन श्रेणी अशी संरचना राहील.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button