Nandurbar

मा. विशेष पोलीस महानिरीक्षक, नाशिक परिक्षेत्र, नाशिक यांचे विशेष पथक स्थानिक गुन्हे शाखेची अवैध गुटखा वाहतुकीवर कारवाई, 45 लाख 20 हजार रुपये किंमतीचा विमल गुटख्यासह 04 आरोपी ताव्यात

मा. विशेष पोलीस महानिरीक्षक, नाशिक परिक्षेत्र, नाशिक यांचे विशेष पथक स्थानिक गुन्हे शाखेची अवैध गुटखा वाहतुकीवर कारवाई, 45 लाख 20 हजार रुपये किंमतीचा विमल गुटख्यासह 04 आरोपी ताव्यात

फहिम शेख/नंदुरबार

नंदुरबार जिल्ह्यात महाराष्ट्रात बंदी असलेला विमल गुटखा तंबाखूची होणारी अवैध चोरटी विक्री व वाहतुकीचे प्रमाण लक्षात घेता मा. विशेष पोलीस महानिरीक्षक, नाशिक परिक्षेत्र, नाशिक डॉ. श्री. बी.जी. शेखर पाटील यांना दिनांक 26/01/2022 रोजी गुप्त बातमीदारामार्फ बातमी मिळाली की. दिनांक 27/01/2022 रोजी सकाळी गुजरात राज्यातील निझर येथुन नंदुरबार मागे दोन पिक अप वाहनांमध्ये विमल गुटख्याची वाहतूक होणार आहे अशी खात्रीशिर बातमी मिळाल्याने मा. विशेष पोलीस महानिरीक्षक, नाशिक परिक्षेत्र, नाशिक डॉ. श्री. बी. जी. शेखर पाटील यांनी तात्काळ आपले विशेष पोलीस पथकाला सदरची माहिती देवून कारवाई करणेबाबत आदेशीत केले होते.मिळालेल्या खात्रीशीर बातमीच्या आधारे मा. विशेष पोलीस महानिरीक्षक, नाशिक परिक्षेत्र, नाशिक डॉ. श्री. बी.जी. शेखर पाटील यांचे मार्गदर्शनाखाली विशेष पोलीस पथकाचे प्रमुख पोलीस निरीक्षक श्री. बापू रोहम यांनी स्थानिक गुन्हे शाखा नंदुरबारचे पोलीस निरीक्षक श्री. रविंद्र फळमकर यांचे मदतीने अत्यंत गोपनीयता पाळत दिनांक 26/1/2022 रोजी रात्री नंदुरबार येथे निझर ते नंदुरबार मार्गावर धमडाई फाटया जवळील सुष्टी हॉटेल समोर सापळा रचला. गुजरात राज्यातील निझर येथुन नंदुरबारकडे दिशेने येणाऱ्या वाहनांची तपासणी करीत असतांना दिनांक 27/01/2022 रोजी सकाळी 05.00 वाजेचे सुमारास गुजरात राज्यातील निझरकडून नंदुरबारच्या दिशेने दोन पिक अप वाहन वेगाने येतांना दिसुन आल्याने मा. विशेष पोलीस महानिरीक्षक विशेष पथकातील अमलदारांनी त्यांना हातातील बॅटरीच्या सहाय्याने वाहन उभे करण्याचा इशारा दिला परंतु वाहन चालकाने वाहन न थांबविता भरधाव वेगाने पुढे निघुन गेले म्हणून पोलीसांची खात्री झाल्याने सदर दोन्ही वाहनांचा पाठलाग करून शिताफीने दोन्ही वाहनांना थांबविले असता गाडी क्र. MH-39C9289 वरील वाहन चालक हा वाहन तेथेच सोडून पळून गेला. तसेच वाहन क्रमांक MH-48 AY-6320 हिचेवरील वाहन चालकास पोलीसांनी शिताफीने पाठलाग करुन ताब्यात घेतले व त्यास त्याचे नांव गांव विचारले असता त्याने त्याचे नांव छोटु रमेश भिल वय 25 वर्ष रा. हकडवाडी ता. जि. धुळ असे सांगितले. त्यास गाडीमधील मालाबाबत विचारणा केली असता तो उडवा उडवीची उत्तर देवू लागला त्यामुळे पोलीसांनी वाहनांची तपासणी केली असता त्यात खाको रंगाचे व पांढऱ्या रंगाचे प्लास्टीकचे पोते दिसली ती उघडून पाहिले असता त्यात महाराष्ट्रात बंदी असलेला विमल गुटखा मिळुन आला, आरोपीतास सदरचा विमल गुटखा बाबत विचारपुस केली असता त्यांनी गुजरात मधील निझर येथुन धर्मेश घनश्यामदास हासानी रा, नंदुरबार याचेकडून विकत घेवून धुळे येथील राहणारे) विक्की महादेव परदेशी रा. धुळे 2) एकनाथ (बाळू) भालचंद्र पाटील रा. धुळे यांनी विकत घेतल्याची माहिती दिली.
ताब्यात घेण्यात आलेल्या पिक अप वाहन क्रमांक MH-39 C 9289 यात 1) 1.18.800/-रु. कि. विमल पान मसाला लिहलेले एकूण 600 पाकीटे 2) 13,200/- रु. कि. वि. तम्बाकू नाव लिहलेले 600 तंबाकू चे पाकीटे 3)13,83,800/- रु. कि. विमल पान मसाला लिहलेले एकुण 7,400/- रु. कि. 4) 2,44,200/ रु. कि. वि. 1 तम्बाकू नाव लिहलेले 7,400 तंम्बाकू चे पाकीटे व 5,00,000 रु. किं. वे MH-39 C9289 पिक अप वाहन असा एकूण 17,60,000/- रु. किंचा मुद्देमाल व पिकअप वाहन क्रमांक MH-48 AY-6350 यात 1) 14,96,000/- रु. कि विमल पान मसाला लिहलेले एकुण 8000 पाकीटे 2) 2.64,000/- रु. कि. [वि.] तम्बाकू नाव लिहलेले 8000 तंम्बाकू चे पाकीटे व 5,00,0000 रु. किं. चे पिकअप वाहन क्रमांक MH-48 AY 6350 असा एकूण 17,60,000 असा दोन्ही वाहनातील मुद्देमाल वाहनासह 45,20,000 रु. किं. च मुरेमाल जप्त करण्यात आला आहे. गाडी क्र. MH-48 AY-6320 वरील चालक छोटू रमेश भिल वय 25 वर्षे रा, हेकडवाडी ता. जि. धुळे पिक अप वाहन क्रमांक MH-39 C 9289 हिचेवरील वाहन चालक शाहरूख पूर्ण नाव गाव माहित नाही, धर्मेश घनश्यामदास हासानी रा. नंदुरबार, विक्की महादेव परदेशो रा. धुळे, एकनाथ (बाळू भालचंद्र पाटील
रा. धुळे यांचेविरुद्ध उपनगर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. • पिक अप वाहन क्रमांक MH-48 AY-6320 हिचेवरील वाहन चालक चालक छोटु रमेश भिल वय 25 वर्ष रा. हेकडवाडी ता. जि. धुळे यास ताब्यात घेण्यात आले असून त्यास अटक करण्यात आलेली आहे.तसेच गुन्ह्यातील फरार आरोपीबाबत माहिती घेतली असता विक्की महादेव परदेशी रा. धुळे, एकनाथ (बाळू) भालचंद्र पाटील रा. धुळे यांची माहिती काढली असता 1) विक्की महादेव परदेशी रा. धुळे 2) एकनाथ (बाळू) भालचंद्र पाटील रा. धुळे 3) वाहन चालक शाहरुख रा. धुळे हे शिर्डी जि. अहमदनगर येणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्याअनुषंगाने विशेष पोलीस पथकातील पोलीस निरीक्षक श्री. बापु रोहम, सहा पोलीस निरीक्षक श्री. सचिन जाधव व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. रविंद्र कळमकर या दोन्ही पथकातील पोलीस अधिकारी व अमंलदारांनी आपसात उत्तमरीत्या समन्वय साधून ) एकनाथ भालचंद्र पाटील वय 34 रा. नंदाकी बुद्रुक ता. जि. धुळे 1) विकी महादेश परदेशी वय 32 रा. गल्ली नंबर-6, चनी रोड, धुळे ता. जि. धुळे 3) पिक अप वाहन क्रमांक MH-39 C-9289 हिचेवरील वाहन चालक शाहरुख अयुब शेख वय-27 रा. चितोड़ ग्राम पंचायत जवळ, हनुमान मंदीराचे बाजुला, धुळे ता.जि. धुळे यांना शिडी जि. अहमदनगर येथून शिताफीने ताब्यात घेवून नंदुरबार येथे आणण्यात आले व त्यांच्या विरुद्ध पुढील योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे • गुन्ह्याचा पुढील तपास मा. विशेष पोलीस महानिरीक्षक, नाशिक परिक्षेत्र, नाशिक डॉ. श्री. बी. जी. शेखर पाटील यांचे आदेशान्वये स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. रविंद्र कळमकर हे करीत आहेत. तसेच फरार आरोपी धर्मेश घनश्यामदास हासानी रा. नंदुरबार याचा शोध घेण्यात येत असून लवकरच त्यास ताब्यात घेवून आणखीन आरोपी आहेत का? याबाबत तपास करण्यात येईल. नंदुरबार जिल्ह्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात बंदी असलेला विमल गुटख्यावर झालेल्या कारवाईमुळे गुटखा माफियांमध्ये मा. विशेष पोलीस महानिरीक्षक, नाशिक परिक्षेत्र, नाशिक डॉ. श्री. बी. जी. शेखर पाटील यांच्या विशेष पथकाची भिती निर्माण झाली आहे सदरची कारवाई मा. विशेष पोलीस महानिरीक्षक, नाशिक परिक्षेत्र, नाशिक डॉ. श्री. बी. जो. शेखर पाटील, मा.पोलीस अधिक्षक श्री. पी. आर. पाटील, मा. अपर पोलीस अधिक्षक श्री. विजय पवार यांचे मार्गदर्शनाखाली विशेष पोलीस पथकातील पोलीस निरीक्षक श्री. बापु रोहम, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. रविंद्र कळमकर, सहा पोलीस निरीक्षक श्री. संदीप पाटील, विशेष पोलीस पथकातील सहा पोलीस निरीक्षक श्री. सचिन जाधव, असई वशिर तडवी पोह/ सचिन धारणकर, रामचंद्र बोरसे, पोना/प्रमोद मंडलीक, कुणाल मराठे, मनोज दुसाणे, सुरेश टोगारे व स्थानिक गुन्हे शाखा नंदुरबार येथील पोह/दिपक गोरे, रमेश पाडवी, पोना/ राकेश मोरे, पुरुषोत्तम सोनार, पोलीस अमलदार विजय ढिवरे, अभिमन्यु गावीत, दिपक न्हावी, अभय राजपुत, आनंदा मराठे यांनी केली असुन मा. विशेष पोलीस महानिरीक्षक, नाशिक परिक्षेत्र, नाशिक डॉ. श्री बी. जी. शेखर पाटील यांनी संपूर्ण पथकाचे अभिनंदन केले आहे

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button