Amalner

अमळनेर: सोनू भटू चौधरी यांची जळगाव जिल्हा अध्यक्ष पदी व अंमळनेर तालुकाध्यक्ष छोटू रमेश चौधरी यांची निवड..

सोनू भटू चौधरी यांची जळगाव जिल्हा अध्यक्ष पदी व अंमळनेर तालुकाध्यक्ष छोटू रमेश चौधरी यांची निवड..

माहिती अधिकार , पोलीस मित्र व पत्रकार संरक्षण सेना या संघटनेच्या पदाधिकारी-यांनी केले अभिनंदनाचा वर्षाव..
अंमळनेर प्रतिनिधी

अमळनेर श्री सोनू भटु चौधरी हे माहीती अधिकार, पोलीस मित्र व पत्रकार संरक्षण सेना( महाराष्ट्र राज्य)च्या जळगाव जिल्हा अध्यक्ष पदावर निवड करण्यात आले. त्यांनी आपले हे पद भूषवित असताना पदाची जबाबदारी घेवून अडीअडचणी मध्ये सुद्धा कोणत्याही प्रकारच्या समस्या ला न जुमानता अल्पावधीतीच्या कार्यकाळामध्ये संघटनेच्या माध्यमातून अनेक क्षेत्रातील महिला व पुरुषांना संघटीत करून यश मिळवले. आणि मराठवाड्यामध्ये अनेक जिल्ह्यात कार्यकारीन्या तयार करण्यासाठी वरिष्ठांचे मन जिंकले. वरिष्ठांचे आदेश आणि मार्गदर्शन घेऊन निस्वार्थी पणे सेवेत खंड न पाळता अखंड कार्य चालू ठेवून संघटना बांधणीसाठी केलेल्या उत्कृष्ट काम केल्यामुळे त्यांना जळगाव जिल्हा अध्यक्ष निवड करण्यात आले आहे. ती निवड आंतरराष्ट्रीय अध्यक्ष/संस्थापक मा. श्री. डॉ. अविनाश भाऊ संकूडे सर, मा. राष्ट्रीय अध्यक्ष मा. श्री.कैलासदादा पठारे सर यांच्या अनुमतीने. महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मा. श्री. तुळशीरामजी हनुमानजी जांभूळकर याच्या आदेशाने जळगाव जिल्हा अध्यक्ष पदावर निवड केले आहे. या निवडीमुळे संघटनेच्या मित्र परिवारांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून संघटनेच्या पदाधिकारी व मित्र परिवार यांनी सोनू भट्टू चौधरी यांचा मनपूर्वक अभिनंदनाचा वर्षाव करून त्यांना समोरच्या वाटचालीला हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत. तेव्हा आनंदाच्या क्षण .. वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी माझ्या प्रती वरिष्ठांनी स्नेहाची भावना दाखवून जळगाव जिल्ह्यात काम करण्याची संधी व जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तरी या पदाची गरिमा ठेवून सर्व स्तरावरील संघटनेच्या माध्यमातून सन्मान आणि कर्तव्य निष्ठेचे पालन करुन योग्य कायद्याच्या चौकटीत राहून न्याय देण्यासाठी अथक परिश्रम घेऊन कसोशीने संघटनेसाठी प्रयत्न करुन संघटनेचा नाव लौकिक करीन असे भावपूर्ण उद्धगार व्यक्त करुन आदरणीय वरिष्ठांच्या प्रती आदरपूर्वक आभार व्यक्त करून संपूर्ण संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचे स्नेहपूर्वक धन्यवाद मानले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button