sawada

सावदा शहरातील सोमेश्वर नगर व सुगंगा नगर परीसरात ऐन उन्हाळ्यात पाणी मिळेना । नवीन पाईपलाईन टाकूनही पाणी टंचाई कायम

सावदा शहरातील सोमेश्वर नगर व सुगंगा नगर परीसरात ऐन उन्हाळ्यात पाणी मिळेना । नवीन पाईपलाईन टाकूनही पाणी टंचाई कायम

सावदा (प्रतिनिधी) – युसूफ शाह

सावदा येथील नव्याने हद्दीत समाविष्ट झालेल्या सोमेश्वर नगर, सुगंगा नगर, कृषीउत्पन्न बाजार समितीमागील भाग इत्यादी भागात अनेक समस्या असून कोटी रुपयांची कामे झाल्यावरही समस्या कायम असल्याने याभागातील नागरिक दि 9 रोजी सकाळी सावदा पालिकेत मुख्याधिकारी किशोर चव्हाण यांचे दालनात मोठ्या संख्येने आले यावेळी या नागरिकांनी विशेत: एन उन्हाळयात या भागात कमी दाबाने वा कधी कधी पाणीच येत नसल्याने संताप व्यक्त केला
यावेळी नागरिकांनी या भागात व्यवस्थित पाणी पुरवठा होत नसल्या बद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली शहरात इतरत्र सुरळीत पाणी पुरवठा होत असताना या भागात मात्र पाणी पुरवठा वेळेवर न होता तसेच कमी दाबाने होतो कधी पाणीच येत नाही रात्र रात्र जागून सुद्धा पाणी मिळत नसल्याने नागरिक चांगलेच आक्रमक झाले होते यावेळी त्यानी सोमेश्वर नगर भागात नुकतीच पाण्यासाठी नवीन पाईप लाईन टाकण्यात आली यावेळी ती व्यवस्थित टाकली नसल्याचा आरोप देखील केला यामुळे नवीन पाईपलाईन टाकून देखील नागरिकांना पाणी मिळत नसल्याचे समोर आले यामुळे याभागात कोटी रुपये खर्चून टाकलेली नवीन पाईपलाईन निष्क्रिय ठरत असल्याची भावना नागरिकांनी बोलून दाखविली, सोबत येथे होत असलेल्या खडीकरण व गटारी बाबत देखील तक्रारी मांडल्या सोबत या भागात सकाळी कचरा उचलण्यासाठी कर्मचारी लवकर येत नसल्याचे देखील सांगितले
तर सुगंगा नगर भागात जुनी पाईपलाईन असून येथे देखील पाणी मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत सरळ रेषेत धनाजी नाना महाविद्यालया पर्यंत पाणी मिळते मात्र महामार्गाचे थोड्या अंतरावर मध्ये मात्र पाणी मिळत नाही अश्या तक्रारी नागरिकांनी केल्या यावेळी शिवसेनाप्रमुख सूरज परदेशी, तसेच निलेश खाचणे, मीनाक्षी ठोसरे, माजी नगरसेविका, मीनाक्षी कोल्हे, केशव चौधरी, प्रदीप चांदेलकर, मालती ढाके, रवींद्र पाटील, देविदास राठोड, कमल सोनार, यांचे सह नागरिक उपस्थित होते,
दरम्यान यावेळी सुगंगा नगर मध्ये होत असलेल्या कमी दाबाने पाणी पुरवठ्यावर उपाय म्हणून स्वामींनारायण नगर मधील टाकी मधून सोडलेलले पाणी व्यवस्थित यावे दाब निर्माण व्हावा म्हणून रविवार पेठ भागात असलेल्या पालिकेच्या कुपनलिकेतून देखील याच वेळी पाणी पुरवठा जोडावा म्हणजे दाब निर्माण होऊन याभागास व्यवस्थित पाणी मिळेल असा एक उपाय देखील नागरिकांतून सुचविण्यात आला यावर पालिकेने तात्काळ अमलबजावणी केल्यास किमान सुगंगा नगर भागातील नागरिकांची तरी पाणी समस्या दूर होण्यास मोठी मदत होणार आहे

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button