sawada

सावद्यातील गुटखा किंगला पोलिसांचा आशीर्वाद

सावद्यातील गुटखा किंगला पोलिसांचा आशीर्वाद

सलीम पिंजारी प्रतिनिधी फैजपुर तालुका यावल

येथील अनेक दिवसापासून गाजत असलेला सावद्यातील विमल गुटखा किंगला औषध प्रशासन विभागासह पोलिसांचा आशीर्वाद आहे का असा प्रश्न आता उपस्थित होत असून वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून कठोर कारवाईची मागणी होत आहे

याबाबत अधिक माहिती अशी की येथील अनेक दिवसापासून सावद्यातील बस्तानका समोर मोठ्या शॉप मध्ये लाखो रुपयांचा दररोज खुलेआम होत असलेल्या विमल गुटख्याची विक्री होऊन संबंधित औषध प्रशासन विभागांसह पोलिसांचा आशीर्वाद आहे काय असा प्रश्न आता पुढे उपस्थित होत आहे जिल्ह्यात अनेक ठिकाणी विमल गुटक्यावर जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या पथकाने अनेक ठिकाणी लाखो रुपयांचा गुटक्यावर कारवाई केली परंतु सावदा येथील अनेक तालुक्याचे केंद्रबिंदू असलेल्या बसस्थानकासमोरील एका मोठ्या शॉप वर अध्याप कारवाई का होत नाही आहे असा प्रश्न जनसामान्य नागरिकामध्ये उपस्थित झालेला असून मध्य प्रदेशातून दररोज या ठिकाणी लाखो रुपयांचा विमल गुटखा येत असताना आणि दररोज इथूनच रावेर तालुका यावल तालुका मुक्ताईनगर तालुका भुसावल तालुका तालुक्यामध्ये येथूनच बिनधास्त वाहतूक होत असून या गजबजलेल्या परिसरात एवढ्या मोठ्या प्रमाणावर विमल गुटख्याची दिवसाढवळे वाहतूक होत असून या विमल गुटख्याच्या सेवनामुळे अनेकांना कर्करोगाची लागण होत असल्याची भीती मोठ्या प्रमाणावर व्यक्त केली जात आहे याकडे औषध प्रशासन विभाग यांच्यासह पोलिसांचा आशीर्वाद आहे का असा प्रश्न उपस्थित झालेला आहे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या गंभीर बाबीकडे लक्ष देऊन कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यात येत आहे

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button