Khed

सामाजिक आर्थिक शैक्षणिक शोषण थांबवाण्यासाठी संघटीत व्हा – बिरसा क्रांती दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष दशरथ मडावी

सामाजिक आर्थिक शैक्षणिक शोषण थांबवाण्यासाठी संघटीत व्हा – बिरसा क्रांती दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष दशरथ मडावी

खेड / प्रतिनिधी दिलीप आंबवणे

बिरसा क्रांती दल पुणे जिल्हा वतीने जिल्हास्तरीय बैठक उत्साहात पार पडली. त्यावेळी आदिवासी समाजाचे आर्थिक शैक्षणिक सामाजिक शोषण होत आहे ते थांबवण्यासाठी बिरसा क्रांती संघटना उभे करत आहे असे मत बिरसा क्रांती दल राष्ट्रीय अध्यक्ष दशरथ मडावी यांनी मांडले ते जिल्हास्तरीय बैठकी मध्ये मार्गदर्शन करताना बोलत होते, ते म्हणाले समाज संघटन करण्यासाठी जी माणसे स्वतःच्या प्रयत्नाने येतात तेच खरे कार्यकर्ते आहेत माणसांची विचार बदलणे त्यांच्यासाठी कॅडर बेस संघटना करणे.बिरसा क्रांती दलाची स्थापना 2015 मध्ये झाली तीन वर्षांमध्ये आपण अनेक जिल्ह्यांमध्ये पोहोचलो आहे गैर आदिवासी लोकांना सरकार अकरा महीने करारावर नोकरीमध्ये ठेवून संरक्षण देताना दिसत आहे मात्र खरे आदिवासींसाठी त्यांना मानवता दिसत नाही लवकरात लवकर सरकारनी गैर आदिवासी यांना नोकरीतून काढून खरे आदिवासींना न्याय द्यावा.
डी. बी. घोडे म्हणाले, आंबेगाव तालुक्यातील अनेक गावांमध्ये वनविभाग बेकायदेशीर कामे करत आहे त्यासाठी आंदोलन केले पाहिजे. लोकांच्या वैयक्तिक समस्या उभ्या आहेत त्या सोडवण्यासाठी लोकांनी समाजात आले पाहिजे आणि बिरसा क्रांती दलाशी संपर्क साधला पाहिजे.
त्यावेळी राज्य सचिव डी.बी. घोडे, राज्य उपाध्यक्ष विजयराव आढारी, नगरसेवक राहूल आढारी, विदर्भ संघटक अतुल कोवे, संजय बोरकर, पुणे विभागीय अध्यक्ष दिलीप आंबवणे, पुणे जिल्हा अध्यक्ष दत्तात्रय कोकाटे, जिल्हा महासचिव अँड.सुदाम मराडे, जिल्हा संघटक एम.के. कोकणे, तालुका अध्यक्ष रोहित सुपे, कार्याध्यक्ष हरीभाऊ तळपे, सचिव शंशिकात आढारी, उपाध्यक्ष तानाजी भोकटे, उपाध्यक्ष संतोष भांगे,आदिवासी महासंघाचे अध्यक्ष गेणूभाऊ वाजे, संरपच सुधिर भोमाळे, निर्मळ, आदी नागरीक उपस्थित होते.

Leave a Reply

Back to top button