Nanded

सामाजिकदृष्ट्या वंचित असलेला धोबी समाज! राजकीय दृष्ट्याही अजून वंचितच का!–डेबुजी युथ ब्रिगेड महाराष्ट्र-गजानन कोपरे

सामाजिकदृष्ट्या वंचित असलेला धोबी समाज! राजकीय दृष्ट्याही अजून वंचितच का!–डेबुजी युथ ब्रिगेड महाराष्ट्र-गजानन कोपरे

नांदेड/नागेश इबितवार

सर्व डेबूजी युथ ब्रिगेडच्या शिलेदारांना आव्हान करण्यात येते की! कोणत्याही पक्षाच्या मागे जाऊ नये. समाजाचा फक्त use and thro करत आहेत.
राज्यकर्त्यांनी परिट धोबी समाजाला गृहीत धरू नये.राज्यकर्त्यांनो आमचा विचार करा.अन्यथा आम्हाला तुमचा विचार करावा लागेल.
आमचा विरोध आम्ही मत पत्रिकेतून दाखवून देऊ आपल्या बिलोली देगलूर मतदारसंघात विविध धार्मिक सामाजिक नेत्यांचे अनेक पुतळे आणि माहामानवांच्या नावाने मार्ग आहेत पण ज्या महाराष्ट्राला आपल्या कीर्तनातून आणि कृतीतून जगाला स्वच्छतेचा संदेश देणारे व अहोरात्र समाजासाठी झटले , स्वताच्या संसराचा सुद्धा त्याग केला.आशा संतांचा सन्मान करुन गौरव केला पाहिजे.राष्ट्रसंत गाडगेबाबा यांचा नांदेड शहरात व जिल्ह्यात अजूनही एकही पुतळा नाही मग राष्ट्रसंत गाडगे बाबा फक्त तुम्हाला निवडणुकीपुरतेच आठवतात का! परीट/धोबी समाजाचा युवक आता जागृत झालेला आहे त्यांना स्वतःच्या विचारांची जाण आहे.तो समाज सुद्धा राजकिय द्रष्ट्या सक्षमआहे. जो आमचा विचार करणार नाही! त्याचा आम्ही पण विचार करणार नाही!आता आमचा निर्धार पक्का जो करेल धोबी समाजाचा विचार त्यालाच मारू शिक्का.?देगलुर-बिलोली मतदार संघात धोबी समाज २५००० पंचविस हजार पेक्षा जास्त संख्येने आहे म्हणून नेत्यानो आमचा आगोदर विचार करा.;आम्ही कोणाला निवडुन जरी आणु शकत नसलो तरी एखाद्याला नक्कीच पाडु शकतो; .ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. समाज आता हुशार व बुद्धीवंत झाला आहे. ज्या अमेरिकेने अमरावती येथे येऊन स्वच्छतेचे जनक राष्ट्रीय संत गाडगेबाबा यांचा गौरव व सन्मान केला.पण आमच्या देशाततील लोकांना अजूनही गाडगेबाबा कळाले नाहीत ही सर्वात मोठी शोकांतिका आहे. एवढया मोठ्या नांदेड जिल्ह्यात स्वचछतेचे जनक राष्ट्रसंत गाडगे महाराज यांचा पुतळा नाही .खरच समाजाचं दुर्दैव आहे.आणी देगलुर व बिलोली मध्ये रष्ट्रसंत गाडगेबाबा या माहमानवाची साधी पाटी नाही.म्हणून नेत्यानो आमचा समाज पण आता बुद्धीवान व हुशार झाला आहे.तुमच्या भुलथापांना आता बळी पडणार नाही. ; जो पक्ष,जो नेता, लवकरात लवकर आमच्या मागण्या पूर्ण करतील! आणी आम्हाला सोबत घेऊन चालतील त्यांनाच आमचा पाठिंबा राहील.!आन्यथा आमचा समाज वेगळाच विचार करेल.धोबी समाज दुतखुळा नाही. योग्य वेळी समाज योग्य निर्णय नक्कीच घेईल.आणी त्यांना त्यांची जागा दाखवून देईल.आमच्यामुळे तुमचा खुप फायदा झाला. परंतु तुमच्या मुळे आमची एकही मागणी पूर्ण झाली नाही.आणी जो पक्ष आम्हाला विचारात घेईल त्यांच्या पाठीशी आम्ही खंबिर पणे साथ देऊ.परंतू आमचा निवडणूकी पर्यतच वापर करत आहात? हीच मोठी शोकांतिका आहे. यामुळेच समाज बांधवांतुन नाराजीचा सूर निघत आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button