Pandharpur

समाजसेवक संजय बाबा ननवरे यांच्याकडून पत्रकार भैरवनाथ कडाळे यांच्या परिवाराला आर्थिक सहाय्य.

समाजसेवक संजय बाबा ननवरे यांच्याकडून पत्रकार भैरवनाथ कडाळे यांच्या परिवाराला आर्थिक सहाय्य.

(प्रतिनिधी)
रफिक अत्तार

पंढरपूर तालुक्यातील सुगाव भोसे येथील ग्रामीण पत्रकार भैरवनाथ कडाळे यांचा काही दिवसांपूर्वी कोरोना ने मुंबई येथे दुर्दैवी मृत्यू झाला कडाळे यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत हालाखीची असल्याने पंढरपूर येथील समाजसेवक श्री संजय बाबा ननवरे यांनी त्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत व एक महिना पुरेल एवढे अन्नधान्य ,किराणा साहित्य दिले यावेळी बोलताना श्री संजय बाबा ननवरे म्हणाले की भैरवनाथ कडाळे हे अत्यंत खडतर परिस्थिती असूनही २४ तास पत्रकारिता करत होते या क्षेत्रात धावपळ आणि दगदग जास्त असूनही कधीही प्रकृतीची तमा न बाळगता त्यांनी ऊन वारा पाऊस अशा काळातही सुगाव भोसे येथून पंढरपूरला येऊन जाऊन विविध वाहिन्या आणि वृत्तपत्रे यांना बातम्या संकलित करून तसेच फोटो, व्हिडीओ कॅसेट पाठवित असत. मागील वर्षी त्यांच्या पत्नीचा मोठा अपघात झाला होता कडाळे यांच्याकडे त्यांच्या उपचारासाठी रक्कम नसतानाही त्यांनी न डगमगता व परिस्थितीपुढे हार न मानता आपल्या पत्नीचे उपचार केले विविध संकट आले तरी त्यांचा चेहरा कायम हसतमुख असे. आणि सर्व पत्रकार बांधवांना ते नेहमीच सहकार्य करत असतं कडाळे यांच्या जाण्याने पंढरपूर तालुक्यातील पत्रकारिता क्षेत्राची मोठी हानी झाली आहे .असे संजय ननवरे म्हणाले श्री संजय बाबा ननवरे हे समाजातील आर्थिक दुर्बल व गरीब घटकांना सर्व प्रकारची मदत करण्यास नेहमीच अग्रेसर असतात .चप्पल लाईन येथील काही दुकाने मागील वर्षी शॉर्टसर्किटमुळे जळाली होती या दुकानदारांना भरीव आर्थिक मदत संजय ननवरे यांनी केली होती व भोसले चौकामधील जुने कपडे विकणारे महिला विक्री त्यांना आर्थिक भरीव मदत केली
तसेच संतोष साळुंखे या युवकाने सावकाराच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली होती, त्यांच्या कुटुंबियानाही संजय ननवरे यांनी आर्थिक मदत केली होती.कोरोना लॉकडाउन काळातही शेकडो कुटुंबियांना त्यांनी अन्नधान्य किट ,आर्थिक मदत केली. पत्रकार सुरक्षा समितीचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्री रामचंद्र सरवदे आणि सहसचिव रफिक आतार यांचे मोठे सहकार्य याकामी लाभले,ग्रामीण भागामधील व शहरांमधील गोरगरिबांच्या हाकेला धावून जाणारे संजय बाबा ननवरे म्हणजे पंढरीतील दमदार व्यक्तिमत्व असे गोरगरीब जनतेच्या मनातून ओळखले जाते यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून समाजसेवक श्री संजय बाबा ननवरे हे ओळखले जातात. यावेळी निखिल सप्ताळ, तुकाराम तारापूरकर आदी उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button