Bhandra

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते कुलदीप गंधे यांच्या वाढदिवसानिमित्त सत्कार

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते कुलदीप गंधे यांच्या वाढदिवसानिमित्त सत्कार

भंडारा : निमगाव येथील सामाजिक कार्यकर्ते कुलदीप गंधे यांच्या ३१ व्या वाढदिवसानिमित्त व सामाजिक कार्याची दखल घेऊन प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्याच्या वतीने त्यांना शाल, लिंम वृक्षांचे रोपटे व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे राज्य उपाध्यक्ष पंकज वानखेडे व प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे राज्य सरचिटणीस संजीव भांबोरे यांच्या वतीने या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी पहेला ग्रामपंचायतचे उपसरपंच सुशील बांडेबुचे, शरद (डॅनी) ठवकर, रामेश्वर खराबे व सनराइज् कॉम्प्युटरचे विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन सनराइज कॉम्प्युटरचे संस्थापक विलास बांडेबुचे यांनी केले तर आभार सामाजिक कार्यकर्ते कुलदीप गंधे यांनी मानले.

Leave a Reply

Back to top button