Pandharpur

समाजसेवक संजय बाबा ननवरे यांनी जोपासली सामाजिक बांधिलकी

समाजसेवक संजय बाबा ननवरे यांनी जोपासली सामाजिक बांधिलकी


रफिक आतार

पंढरपूर : पंढरपूर शहर व ग्रामीण भागामध्ये नेहमीच कला, क्रिडा, शैक्षणिक अशा आदी सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या संजय बाबा ननवरे यांनी शहरातील क्रांतिसिंह नाना पाटील (काॅलेज) चौक येथील झोपडीत राहणाऱ्या उदरनिर्वाहच कसा तरी मोलमजुरी करून पोट भागवणाऱ्या गरीब पालकांच्या मुलांना सध्या ऑनलाइन प्रणालीच्या माध्यमातून शिक्षण घेण्यासाठी अँड्रॉइड फोनची व्यवस्था होती नाही व अशा वेळी हातावर पोट असणारे पालक महागडे मोबाईल घेऊ शकत नसल्याने य
येथील पंधरा ते वीस विद्यार्थ्यांना अँड्रॉइड फोनची आवश्यकता लक्षात घेऊन राॅबिनहूड अकॅडमीच्या सदस्यांनी सामाजिक क्षेत्रात काम करत असलेल्या विविध व्यक्तींकडे याबाबत चर्चा करून संगनमताने काही मदत करता येईल का यासाठी गाठीभेटी घेतल्या यावेळी समाजसेवक संजयबाबा ननवरे यांना राॅबिनहूड अकॅडमी सदस्यांची संकल्पना क्षणात पटली व त्यांनी या विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन शिक्षणासाठी एक अँड्रॉइड फोन घेऊन देऊन आपली सामाजिक बांधिलकी जोपासली असल्याचे दिसून येत आहे. संजय बाबां ननवरे यांची ब्रीदवाक्य म्हणजे आपण ही समाजात वावरत असताना काहीतरी देणे लागत आहे या उद्देशाने अँड्रॉइड मोबाईल घेऊन दिला

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button