Bhusawal

खान्देशातील सामाजिक चळवळीतील तारा निखळला सामाजिक कार्यकर्ते हमीद शेख अनंतात विलीन

खान्देशातील सामाजिक चळवळीतील तारा निखळला सामाजिक कार्यकर्ते हमीद शेख अनंतात विलीन

भुसावळ : भुसावळ येथील सामाजिक कार्यकर्ते हमीद शेख यांचे कोरोना आजारा मुळे निधन झाल्याने खान्देशात हळहळ व्यक्त होत आहे.

सविस्तर वृत्त असे की, खान्देशात दोन समाजात सामाजिक बांधिलकी जोपासण्याकामी आपल्या रेल्वेतील उच्च पदाचा राजीनामा देऊन अहोरात्र कार्यकरणारे हमीद शेख यांचे काल मुबंई येथे कोरोना वर उपचार घेत असतांना निधन झाले. सदर वृत्त समजताच खान्देशात सामाजिक क्षेत्रात शोककळ पसरली, देशात जातीयवादी विषम विचारधारा जोमाने फोफावत असतांना महम्मद पैगंबर-शिव-फुले-शाहू-आंबेडकरांची समतेची-भाईचारेची विचारधारा दोन समाजात रुजविण्यासाठी वेळ प्रसंगी जीव मुठीत घेऊन प्रचार-प्रसार करण्यासाठी प्रयत्न करणारे थोर प्रचारक म्हणून त्यांची ख्याती होती. खान्देशात प्रत्येक तालुक्यात सामाजिक बांधिलकी निर्माण व्हावी म्हणून ठीक ठिकाणी सभा-बैठका घेण्याचा त्यांनी चंग बांधला होता. देशातील मुस्लिम व ८५% बहुजन समाजातील एससी,एसटी,ओबीसी व धर्मपरिवर्तीत लोकांच्या एकीवरच देशाचे भवितव्य अवलंबून असल्याची त्यांची धारणा होती. राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा च्या माध्यमातून त्यांनी संपूर्ण खान्देश पिंजून काढला होता.मुस्लिम समाजातील तरुण पिढीला खरे शिव चरित्र सांगण्याचे महत कार्य त्यानी केले आहे. देशातील मुस्लिम व ८५% बहुजन समाजातील एससी,एसटी,ओबीसी व धर्मपरिवर्तीत लोकांचे रक्त एकच असल्याचा त्यांचा विश्वास होता. त्यांच्या अश्या अचानक जाण्याने खानदेशातील सामाजिक चळवळीवर शोककळा पसरली आहे.

राष्ट्रीय किसान मोर्चा चे राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रा शिवाजी पाटील यांनी शोक संदेशात सांगितले की, हमीद शेख साहेबांच्या जाण्याने सामाजिक क्षेत्रातील एक सच्चा कार्यकर्ता हरपल्याने सामाजिक चळवळीत पोकळी निर्माण झाली आहे.

छत्रपती क्रांती सेना चे जळगांव जिल्हा अध्यक्ष किशोर पाटील (धायडे)यांनी आपल्या शोकसंदेशात सांगितले की, दोन समाजातील दुवा निखळला,आमची फार मोठी हानी झाली.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button