Dharangaw

सहा वर्षाच्या मुलीवर 62 वर्षाच्या वृद्धाने केला अत्याचार..जिल्ह्यात खळबळ..!

सहा वर्षाच्या मुलीवर 62 वर्षाच्या वृद्धाने केला अत्याचार..जिल्ह्यात खळबळ..!

धरणगाव शहरातील सहा वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्या ६२ वर्षीय वृध्दाला अटक करण्यात आली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. संशयित आरोपीला धरणगाव न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, धरणगाव येथील मराठी गल्ली परिसरात चंदुलाल शिवराम मराठे (वय-६२) याची राजमाता पीठाची गिरणी आहे. परिसरात राहणारी एक महिला रविवारी २० फेब्रुवारी रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास आठ आणि सहा वर्षाच्या बालिकेंसह दळण दळण्यासाठी पिठाच्या गिरणी वर आली. दोघी चिमुकल्या मुली अंगणातच खेळत होत्या. त्यावेळी चंदुलाल मराठे याने आठ वर्षाच्या मुलीला आक्षेपार्ह अवस्थेत आपल्या मांडीवर घेतल्याचे आईच्या लक्षात आले. तिने संताप व्यक्त करून दोन्ही मुलींना घरी आणले.

पिडीत मुलीच्या आई व वडीलांनी सायंकाळी धरणगाव पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून धरणगाव पोलीसात गुन्हा दखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर संशयित आरोपी चंदुलाल मराठे यांला ताब्यात घेतले आहे. पीडित चिमुकलीला मुलीला वैद्यकीय तपासणीसाठी धरणगाव ग्रामीण रुग्णालय नेले असता तिच्यावर अत्याचार झाल्याचा प्राथमिक अहवाल देण्यात आला. पुढील तपासणीसाठी या बालिकेला तात्काळ जळगाव जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

संशयित आरोपी चंदुलाल शिवराम मराठे (वय-६२) रा. मराठे गल्ली, धरणगाव याला सोमवारी २१ फेब्रुवारी धरणगाव न्यायालयात हजर केले असता एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button