Dondaicha

नगरपालिका हद्दीतील दुकानांचे सहा महिन्यांचे मालमत्ता कर व भाडे माफ करावे…

नगरपालिका हद्दीतील दुकानांचे सहा महिन्यांचे मालमत्ता कर व भाडे माफ करावे…

नगराध्यक्षा व मुख्याधिकारी यांना सह्यांचे निवेदन देत गावातील दुकानदारांनी केली मागणी…

दोडांईचा : करोनासारख्या गंभीर आजारावर खबरदारी घेत, २२ मार्च २०२० पासुन संपुर्ण देशात सरकारने जनता कर्फू पुकारत पुर्ण देश लाँकडाऊन केला. त्यामुळे दोडांईचासारख्या लहानश्या शहरातही सरकारचे नियम पाळत येथील व्यापाऱ्यांनी आपापली दुकाने कडेकोट बंद ठेवली. म्हणून आता कुठे जावून हळूहळू व्यवसाय पुर्वपदावर येत,आर्थिक घडी पुर्णतः विस्कटलेली आहे. म्हणून दोडांईचा वरवाडे नगरपालीकेने मागील एक एप्रिल ते तीस सप्टेंबरपर्यंतचे आपल्या हद्दीतील दुकानांचे मालमत्ता कर व गाळे भाडे माफ करावे,अशी मागणी सह्यांच्या माध्यमातून दुकानदारांनी केली आहे.

याबाबत दोडांईचा वरवाडे नगरपालीकेच्या मा.नगराध्यक्ष:,व मा.मुख्याधिकारी यांना दिलेल्या निवेदनाचा विषय असा की,आम्ही खालील सह्या करणार, दोडांईचा वरवाडे नगर परिषद हद्दीतील व्यवसायिक आपणास विनंती करतो की, आमची व्यवसायिक दुकाने दोडांईचा वरवाडे नगर परिषद हद्दीत असुन त्यावर नगरपालिका मालमत्ता कर व भाडे आकारते.२२ मार्च २०२० पासुन लाँकडाऊनला सुरुवात झाली. त्यामुळे शासनाच्या निर्दशाप्रमाणे अत्यावश्यक सेवेच्या दुकाने विशिष्ट कालावधीत सुरु ठेवून.उर्वरित सर्व व्यवसायिक दुकाने बंद ठेवण्यात आली होती. गेल्या पंधरा दिवसापासून दुकानांचा व्यवहार थोडाफार सुरु झाला आहे. लाँकडाऊनच्या दरम्यान सर्वच बंद असल्याने सर्व स्तरातील लोक आर्थिक अडचणीत सापडल्याने आजही पुर्ण मंदी बाजारात पसरलेली आहे.त्यामुळे बाजारपेठ सुरु होऊन देखील व्यवसायिकांना ग्राहक नसल्याने मोठ्या आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. अशा परिस्थितीत २२ मार्च ते जुन दुकाने पुर्ण बंद राहिली. जुन ते सप्टेंबरच्या दरम्यान विशिष्ट कालावधीत दुकाने सुरु राहिली. त्यामुळे सर्व व्यवसायिक मोठ्या अडचणीत सापडले आहेत. लाँकडाऊनच्या दरम्यान दुकाने बंद असल्याने व्यवसायिकांना कोणतेही उत्पानाचे साधन राहिलेले नाही.

वेगवेगळ्या स्तरातून, कोणत्यान कोणत्या पद्धतीने प्रशासन, स्थानिक स्वराज्य संस्था व्यापार ,व्यवसायिकांना स्थैर्य प्राप्त करून देण्याकरिता वेगवेगळे निर्णय घेत आहे. जवळच्या नंदुरबार नगरपालीकेने शहरातील व्यापारी, व्यवसायिक दुकानदारांना आर्थिक दिलासा मदत देण्याकरिता मालमत्ता कर व भाडे सूट दिली आहे. त्या पाश्वभुमीवर दोडांईचा वरवाडे नगर परिषदने देखील आर्थिक वर्षे १ एप्रिल २०२० ते ३१ मार्च २०२१ हया आर्थिक वर्षात १ एप्रिल ते ३० सप्टेंबर हया सहा महिन्याचे मालमत्ता कर व भाडे माफ करावे.जेणेकरुन व्यापारी, व्यवसायिक यांना आर्थिक स्थैर्य प्राप्त होईल ,असेही शेवटी निवेदनात नमूद केले आहे.

यावेळी निवेदनावर श्री कल्पेश मराठे, श्री कुष्ण रामदास मराठे, श्री जितेंद्र नानाभाऊ मराठे, आनंद ट्रान्सपोर्ट, वेदांत आँटो पार्टस, नवकार टायर्स, सचिन बियर शाँपी, राज बियर शाँपी, व्हीआयपी पान सेटंर, मातोश्री इंटरप्राईजेस, राम मिल्क प्राँडक्स , निलेश बियर बार, डिएस पार्टस, माता बिजासनी आँटो, खुशी आँटोमोबाईल,अर्चना वेल्डिंग वर्क्स, जय बालाजी वर्क्स, एकवीरा आँटो गँरेज, सप्तशृंगी बाईक पाईटं, कुष्णा आँटो गँरेज, नँशनल सर्व्हिस सेटंर, काशीनर्मदे वेल्डीगं वर्क्स, मनोज इंगळे, भाग्यश्री आँटो गँरेज, प्रकाश मराठे, शकील तांबोळी, नाटू पाटील, हाँटेल अभिजित बियरबार, भाऊ तानाजी बियर शाँपी, राहुल इलेक्ट्रॉनिक्स, विजय सिसोदिया, हिरालाल ठाकूर, राजेन्द्र मुसळे, भारतीबाई प्रकाश शर्मा आदींच्या सह्या आहेत.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button