Akola

पालकमंत्री बच्चू कडू यांच्या युट्युब चॅनलला सिल्व्हर प्ले बटन

पालकमंत्री बच्चू कडू यांच्या युट्युब चॅनलला सिल्व्हर प्ले बटन

अकोला : राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, शालेय शिक्षण, महिला व बालविकास, इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, कामगार राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांच्या यु ट्यूब चॅनलला आज यु ट्यूब कडून मानाचे सिल्व्हर प्ले बटन प्रदान करण्यात आले. यु ट्युबच्या अमेरिकेतील कार्यालयाकडून प्राप्त या पत्राचा आज ना.कडू यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात स्वीकार केला. समाज माध्यमांमध्ये ना.कडू हे लोकप्रिय असून त्यांना मोठी फॉलोअरशिप लाभली आहे. यु ट्यूब वर ना.कडू यांना एक लाख87 हजार फॉलोअर्स आहेत. या शिवाय ट्विटर 2 लाख 51 हजार, फेसबुक 7 लाख 2 हजार फॉलोवर व इंस्टाग्राम 3 लाख 20 हजार यासारख्या माध्यमांवरही ना.कडू यांना फॉलोअर्स आहेत.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button