Motha Waghoda

मोठा वाघोदा येथील शुभम बाविस्कर खेळाडू ला राज्यस्तरीय पुरस्कार ग्रामपंचायततर्फे सरपंच सदस्यांनी केला सत्कार

मोठा वाघोदा येथील शुभम बाविस्कर खेळाडू ला राज्यस्तरीय पुरस्कार ग्रामपंचायततर्फे सरपंच सदस्यांनी केला सत्कार

मुबारक तडवी मोठा वाघोदा.ता.रावेर

मोठा वाघोदा : मोठा वाघोदा येथील श्री स्पोर्ट्स क्लब चा खेळाडू शुभम अर्जुन बाविस्कर या खेळाडूने हरियाणा येथील स्टुडंट्स ऑलिंम्पिक नॅशनल गेम्स या रनिंग स्पर्धेत १५०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत बाजी मारत राज्यस्तरावर दुसरा क्रमांक पटकाविला
हरियाणा येथील रनिंग स्पर्धेत सहभागी होऊन राष्ट्रीय ऑलिंपिक स्पर्धेत सहभागी होऊन दुसरा क्रमांक पटकाविला आणि मोठा वाघोदा गावाचं नाव उज्ज्वल केले बद्दल मोठा वाघोदा येथील ग्रामपंचायतीचे सरपंच मुबारक (राजू)अलिखा तडवी यांनी शाल श्रीफळ पुष्पहार देऊन सत्कार केला तसेच उपसरपंच लक्ष्मीकांत बाजीराव चौधरी माजी सरपंच तथा विद्यमान सदस्य कालू मिस्तरी ग्रामपंचायत सदस्य उदय पाटील, भुषण चौधरी, संजय माळी स्वप्निल पवार पत्रकार कमलाकर माळी ग्रामसेवक नितीन महाजन विशाल पाटील हर्षल पाटील महिला सदस्या प्रमिला भालेराव,क्लार्क प्रकाश वायके, पंकज मालखेडे, राहुल महाजन,अजय ढाके आदींनी पुष्पहार देऊन शुभम बाविस्कर या खेळाडूचा सत्कार केला मोठा वाघोदा गावाचं नाव परराज्यात उज्ज्वल करीत विशेष प्राविण्य मिळवले बद्दल गावात सर्वत्र शुभम बाविस्कर या खेळाडूचा सर्वस्तरातून कौतुक होत आहे

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button