Faijpur

श्री खंडोबा यात्रामहोत्सव कायदासुव्यस्था – कोरोना नियमांचे पालन करून शांततेत पार पाडावी – प्रांताधिकारी कैलास कडलक

श्री खंडोबा यात्रामहोत्सव कायदासुव्यस्था – कोरोना नियमांचे पालन करून शांततेत पार पाडावी – प्रांताधिकारी कैलास कडलक

सलीम पिंजारी प्रतिनिधी फैजपुर तालुका यावल

संजय सराफ फैजपुर ता यावल ११ मार्च
आगामी होळी पौणिमा पासून सुरू होणारी श्री खंडोबा देवस्थान फैजपूर यात्रा महोत्सव कायदासुव्यस्था – कोरोना नियमांचे पालन करून शांततेत पार पाडावी यासाठी फैजपूर पोलीस प्रशासनाने दिनांक १०/३/२०२२ रोजी शांतता समितीची बैठकीचे आयोजन केले होते या बैठकीच्या अध्यक्षस्थानी फैजपूर उपविभागीय अधिकारी कैलास कडलक होते

याप्रसंगी पोलिस व नगरपालिका तसेच विद्युत महामंडळ ,मंदिर प्रशासनाने यात्रा महोत्सवात होणारी वाढती गर्दी बघता पोलीस प्रशासना तर्फे योग्य बंदोबस्त करून ही यात्रा निर्भय पणे पार पाडण्यासाठी विविध विषयांवर सुनियोजन साठी सर्वांनी सहकार्य करावे असे सूचना आवाहन फैजपुर उपविभागीय अधिकारी कैलास कडलक व पोलिस अधिकारी डॉ कुणाल सोनवणे यांनी केले आहे
व्यासपीठावर फैजपुर उपविभागीय अधिकारी कैलास कडलक,उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ कुणाल सोनवणे, खंडोबा देवस्थान चे गादीपती महामंडलेश्वर श्री श्री पुरुषोत्तमदासजी महाराज, फैजपुर पालिकेचे मुख्याधिकारी वैभव लोंढे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर आखेगांवकर, पोलिसउप निरीक्षक मकसुद्दीन शेख,, उपनिरीक्षक मोहन लोखंडे, वीज वितरण कंपनी चे फैजपुर शाखा सहाय्यक अभियंता विनोद सरोदे हे उपस्थित होते.
यावेळ शांतता समिती सदस्य संजय सराफ, माजी नगरसेवक केतन किरगे,शेख कुर्बान ,माजी नगराध्यक्ष मिलिंद वाघूळदे, महामंडलेश्वर पुरुषोत्तम दासजी महाराज यांनी यात्रा महोत्सवातील खबरदारीच्या विषयांवर समयोचित मनोगत मांडत फैजपूर प्राचीन धर्मीक यात्रा महोत्सव हा जातीय सलोख्याचे परंपरा कायदा सुव्यवस्था व कोरोना नियमांचे पालन करून खेळीमेळीचे आनंदात – शांततेत पार पाडण्यची सर्वांनी सहकार्य करण्याची शहर वासीयांतर्फे त्यांनी यावेळी ग्वाही दिली.
दरम्यान बैठकीला फैजपूर मंडळ अधिकारी हनिफ तडवी, तलाठी तेजस पाटील, जिल्हा दूध संघ संचालक हेमराज चौधरी, माजी नगराध्यक्ष निलेश राणे, माजी नगरसेवक शेख जफर, माजी नगरसेवक अमोल निंबाळे, माजी नगरसेवक संजय रल, भाजपा शहराध्यक्ष अनंता नेहेते, काँग्रेस शहराध्यक्ष शेख रियाज,युवक शहराध्यक्ष वसीम तडवी, युवा मोर्चा ता उपाध्यक्ष वैभव वकारे, काँग्रेेस जिल्हा सरचिटणीस रामाा मोरे, रविंद्र होले,सादिक शेख, शेख शाकिर, शेख उस्मान, रामाराव मोरे, नरेंद्र चौधरी, भाजपा आदिवासी सेल शहर अध्यक्ष रशिद तडवी, वैभव वकारे पवन दास यादव, नरेंद्र चौधरी ,पत्रकार वासूदेव सरोदे ,अरुण होले,समीर तडवी ,उमाकांत पाटील, शेख फारुख सह आदी विविध पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते समाज सेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते
यांच्यासह शांतता कमिटी सदस्य, प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते. यावेळी सूत्रसंचालन सहाय्यक फौजदार हेमंत सांगळे यांनी तर आभार सहाय्यक पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर आखेगावक यांनी केले

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button