Pune

पुसद तालुक्यातील तीर्थक्षेत्र गौळमांजरीतील श्री बिरोबा यात्रा मोठ्या उत्साहात साजरी

पुसद तालुक्यातील तीर्थक्षेत्र गौळमांजरीतील श्री बिरोबा यात्रा मोठ्या उत्साहात साजरी

प्रतिनिधी दत्ता पारेकर

पुणे: गौंळमाजंरी येथील यात्रे निमित्त देवस्थान तर्फे सांस्कृतिक कार्यमांचे आयोजन करण्यात आले होते.
यामध्ये श्री बिरदेव-भैरूसिध्द ओवीकार मंडळ,कुरळप जि. सांगली. या मंडळाच्या माध्यमातुन श्री बिरोबा देवस्थान गौळमांजरी येथे पारंपरिक पद्धतीने देवाचाअभिषेक,आरती व सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले होते. त्यामध्ये श्री बिरोबा देवाच्या भक्तीत तल्लीन होऊन ओव्या, ढोलवादन, हेडाम (वीरनृत्य),भाकनुक करण्यात आली, भाकनुक म्हणजे भविष्यात होणाऱ्या घटना यात सांगितल्या गेल्या.
तसेच माळ पठारावरील पैलवानांना प्रोत्साहन मिळावे या करिता दिनांक १८ फेब्रुवारी रोजी देवस्थान तर्फे दरवर्षीप्रमाणे भव्य कुस्त्यांच्या दंगलीचे आयोजन ही करण्यात आले होते
यात्रे दरम्यान विदर्भ- मराठवाड्यातील बहुसंख्य भाविक भक्तांनी हजेरी लावून कुलदैवत श्री बिरोबाच्या दर्शनाचा लाभ घेतला.
गौळमांजरी हे गाव ईसापूर वन्यजीव अभयारण्यामध्ये येत असून भाविक भक्तांना यात्रे दरम्यान मोठ्या मूलभूत अडचणींचा सामना करावा लागतो. तरी स्थानिक लोकप्रतिनिधींनी ह्या दुर्लक्षित प्राचीन देवस्थान कडे लक्ष देऊन देवस्थानसाठी मूलभूत सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करावे अशी मागणी परिसरातील भक्तांकडून केली जात आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button