Nagpur

श्रावणबाळ, संजय गांधी निराधार योजनेच्या प्रलंबित मानधन तात्काळ द्या –हेल्पिंग हैण्ड एनजिओची मागणी

श्रावणबाळ, संजय गांधी निराधार योजनेच्या प्रलंबित मानधन तात्काळ द्या –हेल्पिंग हैण्ड एनजिओची मागणी

राजेश सोनुने नागपूर

नागपूर : श्रावणबाळ संजय गांधी निराधार योजनेचे प्रलंबित मानधन तात्काळ देण्याबाबत तसेच मानधनात वाढ करण्याची मागणी हेल्पींग हॅन्ड एनजीओच्या वतीने निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांना करण्यात आली.
वृद्ध, निराधार, विधवा, दिव्यांग तसेच दुर्धर आजारग्रस्त व्यक्ती यांना श्रावणबाळ, संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत आधार म्हणून मासिक मानधन देण्यात येते परंतु गेल्या तीन ते चार महिन्यापासून या व्यक्तींना तेमानधन मिळाले नाही त्यामुळे या महागाईच्या काळात या व्यक्तींचे जगणे असह्य होऊन उपासमारीची वेळ आली आहे. तसेच निराधारांना मिळणारे हे १००० रू. मानधन या महागाईच्या काळात अतिशय तुटपुंज आहे. याकरीता सर्वांना मानधन महागाईच्या हिशोबाने ५००० रू. मासिक करण्यात यावे तसेच आतापर्यंतचे प्रलंबित मानधन लवकरात लवकर खात्यात जमा करण्यात यावे. अन्यथा या व्यक्तींवर भीक मागण्याची वेळ येऊ शकते. ए करिता या प्रश्नांचा विचार करून हे प्रश्न तत्काळ मार्गी लावावे व सरकारने मानवतावादी दृष्टिकोनातून प्रलंबित मानधन द्यावे व मानधन वाढ व्हावी अशी मागणी हेल्पिंग हॅन्ड एनजीओच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे करण्यात आली.
यावेळी समाज सेवक श्री भूषण प्रकाशराव दलाल, अथर्व नागपुरे,अभिजीत पाठक, राहुल ठाकुर, भूषण डाहके,रीना जूनघरे प्रीति साऊ, भारती गायकवाड आदी उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button