Aurangabad

धक्कादायक! छेडछाड करत भर रस्त्यात तरुणीचे कपडे फाडले

धक्कादायक! छेडछाड करत भर रस्त्यात तरुणीचे कपडे फाडले

गणेश ढेंबरे औरंगाबाद

औरंगाबाद : औरंगाबादमध्ये महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. औरंगाबादच्या वाळूज परिसरात बजाज कंपनी गेटजवळ भर दिवसा रस्त्यावरच एका महिलेची छेडछाड करत कपडे फाडल्याचा धक्कादायक प्रकार आज उघडकीस आला आहे. महिलेला रिक्षातून उतरवत छेडछाड करणे आणि त्या महिलेचे कपडे फाडण्यापर्यंत आरोपींची मजल गेली. त्यामुळे गुन्हेगारांमध्ये पोलिसांचा वचक आहे की नाही? असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत. आरोपींनी महिलेची छेडछाड करत कपडे फाडल्यानंतर रस्त्यांवरील नागरिक मदतीला धावून आले. त्यांनी या विवस्त्र महिलेला स्वतःचे कपडे दिले. आरोपींनी पीडित महिलेचे कपडे फाडून जबर मारहाण केली. तसेच या महिलेच्या शरीरावर चावाही घेतला. दरम्यान, या घटनेमुळे औरंगाबादमध्ये महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button