Aurangabad

धक्कादायक ! सख्या भावानेच केला बहिणीवर अत्याचार

धक्कादायक ! सख्या भावानेच केला बहिणीवर अत्याचार

गणेश ढेंबरे औरंगाबाद

औरंगाबाद : औरंगाबाद शहरात मागील काही दिवसांपासून गुन्हेगारी वाढतच चाललेली आहे. त्यामुळे सामान्य माणसाच्या मनात अशा घटना कधी थांबणार असा प्रश्न उपस्थित झाला आहे. त्यातच अत्याचार आणि बलात्काराच्या घटना दररोज घडत असतात. पण ही घटना वेगळीच घडली आहे. औरंगाबादेत सख्या भावानेच बहिनीवर अत्याचार केल्याची खळबळजनक, धक्कादायक घटना समोर आली आहे. पीडित मुलीचे पोट दुखत असल्याने खासगी रुग्णालयात गर्भपात केल्याचे समोर आले.

याविषयी अधिक माहिती अशी कि, औरंगाबाद शहरातील नूर कॉलनी परिसरात राहणाऱ्या एका १५ वर्षीय मुलीवर ३३वर्षीय सख्या भावाने क्रूरपणे अत्याचार केल्याचे समोर आले आहे. या पीडित मुलीचे पोट दुखत असल्याने या मुलीला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यात गर्भपात केल्याचे समोर आले. यामुळे भावा बहिणीच्या पवित्र नात्याला काळिमा फासणारी घटना उघडकीस अली आहे. यानंतर बहिणीच्या तक्रारीवरून सिटी चौक पोलीस ठाण्यात नराधम भावाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक अशोक गिरी यांनी आरोपीला ताब्यात घेत जेरबंद केले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button