Jalgaon

धक्कादायक..!जळगांव महामार्गावर आढळले अनेक मृत अर्भके…घटनास्थळी पोलीस दाखल..

धक्कादायक..!जळगांव महामार्गावर आढळले अनेक मृत अर्भके…घटनास्थळी पोलीस दाखल..

जळगाव शहरातील ईच्छादेवी चौफुलीजवळ असलेल्या वखार शेजारील मोकळ्या जागेवर मंगळवारी सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास अनेक अर्भक मृतावस्थेत आढळून आल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. काही इंच आकारापासून एक फुटापर्यंत हे अर्भक असल्याने वेगवेगळे तर्कवितर्क लढविले जात
आहे. ईच्छादेवी चौफुली ते अजिंठा चौफुली दरम्यान वखारी शेजारी मोकळ्या जागी कचरा टाकला जातो. मंगळवारी सायंकाळी ७.३० वाजेच्या काही मुले त्याठिकाणी कचरा वेचत असताना त्यांना मानवी अर्भक सदृश्य गोष्टी आढळून आल्या.
एकदम लहान आकाराचे अर्भक बाटल्यांमध्ये तर इतर मोठे अर्भक मोकळे टाकलेले होते. घटनेची माहिती परिसरात पसरताच नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली.कचऱ्यात मिळालेले मृत अर्भक हे मानवी आहेत की इतर काही प्रकार आहे यावरून तर्कवितर्क करून चर्चेला उधाण येऊन भीतीदायक वातावरण निर्माण झाले होते. घटनास्थळी एमआयडीसी पोलिसांनी धाव घेत चौकशीला सुरुवात केली.

दरम्यान पोलिसांनी एका भंगार विक्रेत्याकडे चौकशी केली असता त्याने एका डॉक्टराकडून काही भंगार खरेदी केले होते त्या भंगारातील एका खोक्यांमध्ये ठेवलेल्या बाटल्यांमध्ये हे अर्भक आढळून आले. नेमके ते काय आहे हे माहिती नसल्याने एका मुलाला ते बाहेर कचऱ्यात फेकण्यास सांगितले होते असे उत्तर त्याने दिले आहे.
पोलिसांकडून या संपूर्ण प्रकरणाची कसून चौकशी केली जात असून रुग्णालयातून निघालेला कचरा हा विशिष्ट पद्धतीने नष्ट करण्याच्या निर्देश असतानाही भंगार विक्रेत्याकडे हे अर्भक पोहोचलेच कसे असा प्रश्न उपस्थित होत आहे. दरम्यान, एखाद्या डॉक्टरने संशोधनासाठी संकलित करून ठेवलेले हे अर्भक असावे असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

संबंधित लेख

Back to top button