Pune

धक्कादायक…पुण्यात अल्पवयीन मुलीवर आठ जणांचा सामूहिक बलात्कार..दोन आरोपी रेल्वे कर्मचारी…! आठ आरोपी अटक..

धक्कादायक…पुण्यात अल्पवयीन मुलीवर आठ जणांचा सामूहिक बलात्कार..दोन आरोपी रेल्वे कर्मचारी…! आठ आरोपी अटक..

दत्ता पारेकर

पुणे रेल्वे स्थानकातून १४ वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तब्बल आठ जणांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पोलिसांनी आठआरोपींना अटक केली आरोपींमध्ये दोन रेल्वे कर्मचारी आहेत. या प्रकरणी पुण्यातील वानवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या संदर्भात अधिक माहिती अशी की पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हा प्रकार ३१ ऑगस्ट ते एक सप्टेंबर या कालावधीत घडला आहे. पीडित मुलगी ३१ ऑगस्ट रोजी गावी जाण्यासाठी रेल्वे स्थानक परिसरात आली होती. मात्र, आता कोणतीही गाडी नाही, तू गावी कशी जाणार, असे म्हणत आम्ही तुझी राहण्याची व्यवस्था करतो, असे आरोपींनी सांगून तिला बाहेर आणले. रिक्षातून तिला वानवडी परिसरात नेले. त्या ठिकाणी आरोपींनी तिच्यावर बलात्कार केला. तसेच, दुसऱ्या दिवशी देखील तिच्यावर बलात्कार करण्यात आला. एकूण सात ते आठ आरोपींनी तिच्यावर बलात्कार केला. हा प्रकार काल उघडकीस आला आहे. त्यानंतर वानवडी पोलिसांनी तात्काळ या आरोपींचा शोध घेत त्यांना अटक देखील केली आहे. आरोपींमध्ये काही रिक्षा चालक आहेत.

पीडित मुलगी ही तिच्या मित्राला भेटण्यासाठी मुंबईला चालली होती. ती मूळची बिहारची असून तिचे वडील वानवडी येथील एका व्यक्तीच्या घरी माळी काम करतात. ती तिच्या आई-वडिलांसोबत राहते. आईवडिलांना न सांगताच ती स्टेशन परिसरात आली होती. पीडित मुलीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळं तिच्यावर मोठा मानसिक आघात झाला आहे. तिच्या उपचारासाठी सर्व प्रकारचे सहकार्य केलं जात असल्याचं वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी सांगितलं.

काही दिवसांपूर्वीच पुण्यातील जनता वसाहत परिसरात अशीच एक भयंकर घटना घडली होती. चार जणांनी एका तरुणीला घरात डांबून तिच्यावर बलात्कार केला होता. त्यानंतर पुन्हा एकदा अत्याचाराची घटना समोर आल्यामुळं महिलांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button