Mumbai

धक्कादायक…! बिग बॉस चा विजेता सिद्धार्थ शुक्लाचा ह्या कारणामुळे झाला मृत्यू..!

धक्कादायक…! बिग बॉस चा विजेता सिद्धार्थ शुक्लाचा ह्या कारणामुळे झाला मृत्यू..!

मुंबई : बिग बॉस फेम अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचं निधन झालं आहे. वयाच्या 40 व्या वर्षी त्याला हृदयविकाराने गाठलं. हृदयविकाराचा झटका आल्याने सिद्धार्थ शुक्लाची प्राणज्योत मालवली. मुंबईतील कूपर रुग्णालयाने त्याला मृत घोषित केलं आहे.

अभिनेता सिद्धार्थ शुक्लाने झोपण्याच्या आधी काही औषधे घेतली होती, पण त्यानंतर तो उठू शकला नाही. सिद्धार्थचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचे रुग्णालयाने पुष्टी केली आहे. सिद्धार्थ शुक्लाचा शवविच्छेदन अहवाल प्रतीक्षेत असून, त्याच्यासोबत राहणाऱ्या लोकांचे स्टेटमेंट घेण्यात येणार असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

टीव्ही जगतातलं एक मोठं आणि यशस्वी नाव म्हणून सिद्धार्थ शुक्लाकडे पाहिलं जायचं. अलीकडेच तो डान्स शो सुपर डान्सर व बिग बॉस मध्ये शहनाज गिलसोबत दिसला होता. त्याने बिग बॉसचा १३ वा सीझन जिंकला होता. याशिवाय खतरों के खिलाडीचा सातवा सीझनही त्याने जिंकला होता. सिध्दार्थला आपल्या अभिनयाची छाप आणि खऱ्या अर्थाने प्रसिद्धी बालिका वधू या मालिकेपासून मिळाली.२००८ मध्ये ‘बाबुल का आंगन छूटे ना’ या मालिकेतून त्याने आपल्या छोट्या पडद्यावर आपल्या करियरला सुरुवात केली होती. यानंतर, त्याने ‘जाने पहचाने से अजनबी’, ‘सीआईडी’, ‘बालिका वधू’ आणि ‘लव यू जिंदगी’ या मालिकांमध्ये काम केले. १२ डिसेंबर १९८० मध्ये त्याचा जन्म मुंबईत झाला.अतिशय सुंदर असल्याने त्याने मॉडेलिंगमधून केली. मॉडेलिंगपासून करियर सुरू केले. यानंतर बॉलिवूड मध्ये काम मिळू लागले. २०१४ मध्ये हंम्टी शर्मा की दुल्हनिया सिनेमात तो दिसला होता. याचवर्षी त्याची ब्रोकन बट ब्युटिफूल ही वेब सीरिजही प्रदर्शित झाली होती. या सीरिजची खूप चर्चाही झाली होती.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button