Bhusawal

धक्कादायक…..साळवा येथे जितेंश पारधी(चव्हान)या युवकास सासरे व त्यांच्या नातेवाईक कडुन जिवंत जाळुन मारण्याचा प्रयत्न….!

?धक्कादायक…..साळवा येथे जितेंश पारधी(चव्हान)या युवकास सासरे व त्यांच्या नातेवाईक कडुन जिवंत जाळुन मारण्याचा प्रयत्न….!

हेमकांत गायकवाड भुसावळ

भुसावळ : भुसावळ येथील रहिवाशी व रेल्वे मध्ये टेक्निशियन या विभागात काम करत असून जितेंश चिंधु चव्हाण वय (३८) वर्षे आहे. त्याची पत्नी सपना सुखदेव पवार (३०) सासरे सुखदेव पवार (५७) सासु सगुना सुखदेव पवार व पत्नी आणि दोघा मध्ये किरकोळ वाद झाला होता. रागाने पत्नी वडीलांच्या गावी साळवा येथे मागील दोन वर्षापासून तिच्या वडिलांच्या घरी गेल्या होती. दोघांमधील वाद मिटून नविन आपल्या संसाराची चागली सुरूवात करु .म्हणून मी पत्नीला घेण्यासाठी साळवा येथे गेलेल्या जावयाला जाळून मारून टाकण्याचा प्रयत्न करण्याची धक्कादायक घटना घडली आहे.
दारात बोलत असताना जावयाच्या अंगावर सासरे व सासु एक अनोळखी व्यक्ती या तिघांनी व यांनी मागुन येवुन पुर्ण अंगावर पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. सदर व्यक्ती ने जेमतेम करून जिव वाचवण्यासाठी पळ काढला व गावातील गल्ली आणि शेता कडे पळत असतांना देखील सासरे लाकडे काठ्या घेऊन मला परत जळालेल्या स्थितीत त्याच्या इतर नातेवाईक जिवंत मारण्याचा मारण्याचा षडयंत्र रचु लागले. व लगेच त्यावेळेस सासु सांगत कि रात्री याला बाधुन ठेवायचे व रात्री आयुष्य संपऊन टाकू. परंतु काही देवदुतानी सदर व्यक्ती ची त्याच्या कडून सुटका करून धरणगांव येथील रुग्णालय दाखल करण्यात आले. व येथील डाॅक्टरानी प्रकृती गंभीर असल्याने जळगांव येथील जिल्हा रुग्णालय दाखल करण्यात आले आहे. सद्या नाजुक स्थितीत असून सदर व्यक्ती ७५ टक्के जळालेला आहे. व त्यांच्या पश्चात आई ,वडील , भाऊ, बहीण असा पडितेचा परिवार आहे व पडीतेच्या परिवाकडुन विनंती आहे. तरी या गुन्हेगार व्यक्तीवर कायदेशीर गुन्हा नोंदवुन. त्याच्यावर दंडात्मक कार्यवाही करण्यात यावी. व एक सुज्ञ नागरिक व पिडीत व्यक्तीस मिळावा. जर याना शिक्षा मिळाली तर या पुढे कोनी भविष्यात सुधा आपल्या जवाई व कोणताच सासरा असा अपराध करणार नाही. सदर माहिती पिडीताच्या परिवाराकडुन मिळाली…

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button